हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़
मो. नंबर – 8983319070
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचा राजपत्रित आदेश
शालेय शिक्षण विभागाने शुक्र वारी शिक्षण हक्क कायद्यात सुधारणा करणारा एक राजपत्रित आदेश जारी केला, त्यानुसार, यापुढे पाचवी आणि आठवीसाठी वार्षिक परीक्षा घेतली जाईल. विद्यार्थीना त्यात उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. अनुतीर्ण होणाऱ्याना दोन महिन्यात पुरवणी परिक्षेची संधी दिली जाईल. मात्र त्यातही यश मिळाले नाही तर सबंधित विद्यार्थिना पुन्हा त्याचवर्गात बसावे लागेल.
शिक्षण हक्क कायद्यानुसार पाचवी ते आठवी च्या विद्यार्थीना अनुतीर्ण केले जात नव्हते. त्यामुळे लाखो विद्यार्थी पुढच्या वर्गात ढकलले जात होते. ताज्या आदेशानुसार, आता या वर्गासाठी वार्षिक परीक्षा घेतली जाणार आहे. शिक्षण आयुक्त सुरज मांढरे या बाबतीत म्हणाले, पाचवी व आठवी हे जीवनातील महत्वाचे टप्पे आहेत. त्यात शिकवलेल्या गोष्टी विद्यार्थीना समजल्या आहेत की नाही याची पड़ताळणी होण्याच्या दृष्टीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.