Home Breaking News पावसाची वाट पाहत…शेतकरी पाहतोय निरभ्र आकाशाकडे

पावसाची वाट पाहत…शेतकरी पाहतोय निरभ्र आकाशाकडे

👉 मान्सुन लांबल्याने शेतकरी चिंताग्रस्त

मारोती अक्कलवाड पा.सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 20 जुन 2023

यावर्षीचे मान्सुन वारे चक्रीवादळाने लांबल्याने खरीप हंगामालातील सुरुवात झाली नाही. अजुन मृग नक्षत्राचा पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या लांबल्या आहेत. तब्बल जुन महिन्यांचे विस दिवस गेले आहेत. तरीही पावसाचा पत्ताच नाही. काळया आईचे पेरणी करुन, ओटी भरण्यासाठी शेतकरीराजा सज्ज झाला आहे. जिकडे पाहावे तिकडे काळ्याभोर जमिनीचे पट्टे दिसत आहेत. अगोदर अवकाळी पाऊस पडला. त्यानंतर पाऊस लांबल्याने जमिनीची मशागत लाकडी, लोखंडी वघराने, नांगरणी करून जमिन गुळगुळीत करुन पेरणीसाठी तयार आहेत. परंतु मृग नक्षत्राचा पाऊस पडला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. खरीप हंगामाला उशीर झाल्यास, रब्बी हंगामातील पिके घेण्यासाठी नक्कीच उशीर होणार आहे. त्यामुळे पिकावर किटक रोगांचा प्रादुर्भाव दिसून येणार आहे. असे जाणकार शेतकरी सांगत आहेत.

👉 मुला- मुलीच्या प्रवेशाची पालकांना लागली काळजी.

सन 2023-2024 या नविन शैक्षणिक वर्षाला जुन महिन्यात सुरुवात झाली आहे. त्यामुळे आपल्या पाल्यांना पुढील शिक्षणासाठी दर्जेदार शिक्षण मिळावे. विद्यार्थ्यांचे भविष्य शोधण्यासाठी पालकांनी विविध खाजगी शैक्षणिक संस्थाना भेटी देत आहेत. खाजगी क्लासेस घेणा-यांनी भरमसाठ फी आकारत, पालकाला जाहिरातीतुन आकर्षित केले जात आहे. त्यामुळे पालक संभ्रमात आहेत. हि वस्तुस्थिती आहे. आजचा शैक्षणिक खर्च शेतकऱ्यांच्या मुला-मुलीना परवडणारा नाही. आधिच वेळेवर पाऊस पडत नाही. त्यात शिक्षणाचा, खते बि- बियाणे, मशागतीचा वाढता खर्च होत असल्याने शेतक-यां मध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Previous article* शांतीदुत हा मानवतेचा…!!
Next articleशेगाव येथे योगा दिवस संपन्न