Home Breaking News बळीराजा जगला तरच… देश जगेल!

बळीराजा जगला तरच… देश जगेल!

👉 नवनिर्वाचित जिल्हा कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे सर यांचे प्रतिपादन.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 16 जुन 2023

नांदेड जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालय येथे नव्याने रुजू झालेले, नवनिर्वाचित जिल्हा कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे सर यांनी आज हिमायतनगर तालुक्यातील विविध प्रक्षेत्रावर भेटी देऊन, मार्गदर्शन करताना म्हणाले, शेतकऱ्यांना वेळोवेळी शेतीच्या संदर्भात सहकार्य करावे. शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती द्यावी. शेतकरी जगला तरच देश जगेल. असेही ते म्हणाले. तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव साहेब व त्यांच्या टिमचे त्यांनी कौतुक केले. सायंकाळी 5:30 वाजता तालुका कृषी अधिकारी कार्यालय हिमायतनगर येथे भेट देऊन, कार्यालयीन कामकाजाचा आढावा जाधव साहेब यांच्या कडुन घेतला. त्यावर बोलतांना अतिशय अभ्यासू, संयमी, शांत हिमायतनगर तालुक्याचे भुमीपुत्र तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव साहेब यांनी सध्या हिमायतनगर कृषि विभागाच्या अडचणी सांगितल्या. त्यावर ते म्हणाले महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध बाबी आहेत, त्या बाबींचे काम करुन शेतकऱ्यांचे पेमेंट करण्यासाठी अडचणी होत आहेत. या तालुक्याला संगनक चालकांची नितांत गरज आहे. तसेच सांख्यिकी विभागा अंतर्गत शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे कामे काही प्रलंबित आहेत. त्या दृष्टीकोनातून हिमायतनगर कृषि कार्यालयात संगनण चालकांची आवश्यकता आहे. तसेच नविन कृषि सहाय्यक, क्लर्क हि रिक्त आहेत. त्यावर ही विभागीय कृषी सहसंचालक साहेबांकडे आपल्या माध्यमातून रिक्त पदे हिमायतनगर तालुक्यातील कार्यालय येथे भरुन, सहकार्य करण्याची विनंती तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव साहेब यांनी केली आहे.

👉 हिमायतनगर गुरुदेव सेवा मंडळ यांनी व तालुका व्यसन मुक्ती हिमायतनगर येथील अध्यक्ष देशमवाड मामा यांनी संतांच्या विचाराचे पुस्तक देऊन साहेबांचा सत्कार केला आहे.
यावेळी हिमायतनगर तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथील सर्व अधिकारी, कर्मचारी, पत्रकार कावडे यांच्यासह भाजपचे माजी पंचायत समिती सभापती, सधन शेतकरी गजानन तुपतेवार यांनीही पुष्पहार देऊन सत्कार केला आहे.
👉 सुत्रसंचालन व आभार मारोती अक्कलवाड पा. सवनेकर यांनी केले आहे.

Previous articleनविन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी पुस्तकाचे वाटप.
Next articleशेतकऱ्यांनी कृषि विभागाच्या योजनेचा लाभ घ्यावा.