Home Breaking News नविन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी पुस्तकाचे वाटप.

नविन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी पुस्तकाचे वाटप.

नविन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी पुस्तकाचे वाटप.

👉 शाळेचा पहिला दिवस

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 15 जुन 2023

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सवना ज. येथे नविन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना सरपंच परमेश्वर गोपतवाड यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पुस्तके वाटप करण्यात आले आहेत. उन्हाळी सुट्टीत लहान चिमुकल्यांनी मनोसोक्त आनंद घेत, विद्यार्थ्यांनी आज 15 जुन रोजी शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेच्या प्रांगणात गर्दि केली होती. यावेळी उपस्थित संरपंच परमेश्वर गोपतवाड, उपसरपंच प्रतिनिधी सोनबा राऊत, शालेय शिक्षण व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष सोनबा अनगुलवार, तंटामुक्ती अध्यक्ष कैलास अनगुलवार, माजी सरपंच सिध्दार्थ राऊत, पुंडलिक भुसाळे, विशाल राऊत, भिमराव राऊत, बोडावार मॅडम, मुधोळकर सर, बोबडे सर आदी शिक्षक व विद्यार्थ्यांचे पालक यावेळी उपस्थित होते.

Previous articleशाळेत टाकता पहिले पाऊल प्रगतीची लागली चाहूल..
Next articleबळीराजा जगला तरच… देश जगेल!