Home Breaking News *जगणं*

*जगणं*

कोणासाठी, कशासाठी.  ✍️✍️………

हा अस वागला, तो तस वागला, कोण कस वागला या विचारात स्वतः त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कस वागायच याचा विचार करा. आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा. त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि पुढच्या चांगल्या प्रवासाला सुरूवात करा!.

या दुनियेत असा एकही मनुष्य नाही ज्याच्या जीवनात अडचणी नाहीत. सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत हा आग्रहच माणसाच्या सर्व दुःखाला कारणीभूत ठरतो. कोणाच्या वाईट वागण्याने आपल काहीही वाईट होत नसत. आपल्याशी कोण कसही वागेना आपण सगळ्यांशी चांगलच वागायच, इतक चांगल की विश्वासघात करणारा ही पुन्हा जवळ येण्यासाठी तळमळला पाहिजे!.

आयुष्याची खरी किंमत तेव्हाच कळते जेव्हा स्वतःच्या जीवनात संघर्ष करण्याची वेळ येते. आयुष्यात फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा आपण जिवंत आहोत म्हणजे खूप काही शिल्लक आहे. जी माणस स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतात तीच माणस आयुष्यात कधीही अपयशी होत नाहीत!.

जगणं कोणाचही सोप नसत. आपण सोडून बाकी सगळ्यांच चांगल आहे अस फक्त आपल्याला वाटत असत. सर्वात सुखी माणूस तोच आहे जो आपली किंमत स्वतः ठरवतो आणि सर्वात दुःखी माणूस तोच आहे जो आपली तुलना इतरांशी करतो. आपल्या किंमतीचा आणि हिंमतीचा अंदाज कधीच कुणाला येऊ देऊ नका. कारण समोरचा नेहमी आपल्या या दोनच गोष्टी शोधत असतो!.

दुसऱ्यांबद्दल वाईट बोलुन त्यांचे दुर्गुण सांगून, आपला चांगुलपणा आणि कर्तृत्व कधीच सिद्ध होत नसते. कठीण परिस्थितीमध्ये योग्य मार्ग निवडून संघर्ष करणे हेच जीवनाचे मूळ समजा!.

समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे तर तुम्ही चांगले आहात म्हणून. व समाजात चांगुलपणा अधिक वाढवण्यासाठी. आपल्या चांगल्या कामात मग्न राहायला शिका. दुसऱ्याचे अजिबात वाईट चिंतु नका. दुसऱ्याच्या दुखाकडे न हसता, त्यांच्याशी मायेने बोला!.

……..✍️ *मारोती अक्कलवाड पा. सवनेकर*
*जिल्हा संपादक नांदेड*
*भ्रमणध्वनी -9763126813*

Previous articleमौजे सरसम (बु.) “खरीपाची तयारी शासन आपल्या दारी” कार्यक्रम संपन्न.
Next articleशाळेत टाकता पहिले पाऊल प्रगतीची लागली चाहूल..