Home Breaking News मौजे सरसम (बु.) “खरीपाची तयारी शासन आपल्या दारी” कार्यक्रम संपन्न.

मौजे सरसम (बु.) “खरीपाची तयारी शासन आपल्या दारी” कार्यक्रम संपन्न.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 12 जुन 2023

सरसम येथे महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत खरीप हंगाम पूर्व नियोजन सभा आयोजित करण्यात आली होती. सदरील सभेस अध्यक्ष म्हणून गावचे सरपंच ॲड. अतुल वानखेडे, प्रमुख पाहुणे राजकुमार रणवीर राजकुमार रणविर उपविभागीय कृषी अधिकारी किंवा, दिलीप जाधव तालुका कृषी अधिकारी, हिमायतनगर हे उपस्थित होते.
सदरील सभेत दिलीप जाधव तालुका कृषी अधिकारी हिमायतनगर यांनी खरीप हंगामाकरिता सोयाबीनचे घरचे बियाणे वापरणे, सोयाबीन पिकातील बीज प्रक्रियेचे महत्त्व, रुंद वरंबा सरी पद्धतीचा फायदा याविषयी मार्गदर्शन केले. प्रा. एस जी. ढगे यांनी 10 % टक्के रासायनिक खतांचा कमी वापर करून जमिनीचे भौतिक व जैविक गुणधर्म सुधारण्यासाठी कशी मदत करतात हे स्पष्ट केले. तसेच सोयाबीन, तूर व कापूस या पिकातील येणाऱ्या विविध कीड व रोग यावर प्रतिबंधक उपाय योजना कशी करावी, घरच्या घरी लिंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत प्रत्यक्ष करून दाखविण्यात आली.


सदरील सभेत उपविभागीय कृषी अधिकारी यांनी फळपिकांचे आर्थिक महत्त्व सांगून , फळबाग लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले.
प्रगतशील शेतकरी अतुल वानखेडे यांनी बीबीएफ पिक पद्धतीने लागवड केल्यामुळे त्यांना झालेले फायदे त्यांच्या मनोगतातून सांगितले.
सदरील कार्यक्रमात बीज प्रक्रिया प्रत्यक्ष करून दाखवण्यात आली त्याचबरोबर टोकन यंत्राचा प्रात्यक्षिक प्रत्यक्ष टोकन यंत्र दाखवून करण्यात आले.
सदरील कार्यक्रमात सोयाबीनच्या मिनी किट 100% अनुदानावर प्रथम प्रधान्याने आत्महत्या ग्रस्थ शेतकरी कुटूंबाला देण्यात आल्यात.
50 % अनुदानावर शेतकऱ्यांना परमिट वाटप करण्यात आले.

सदरील विविध मुद्द्यावर सविस्तर माहिती सांगून शेतकऱ्यांच्या प्रश्नमंजुषेवर उत्तर देऊन शेतकऱ्याचे पूर्णतः समाधान करण्यात आले.
तसेच कृषी सहाय्यक स्वाती बेहेरे यांनी सोयाबीन पिकाची उगवण क्षमता कशी तपासावी याविषयी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवले. तसेच कृषी विभागामार्फत अमलबजावणी करण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती सांगून शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आले.
सदरील कार्यक्रमांमध्ये कृषी पर्यवेक्षक श्री. मारोती काळे फळ पिकाचे महत्त्व सांगून फळबाग लागवड याविषयी तांत्रिक बाबी सांगून फळबाग शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये पुढील पाच वर्षांनी आर्थिक परिस्थिती सुधारू शकते, त्यामुळे शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त फळ पिके लावून सहकार्य करावे जेणेकरून पर्यावरण पूरक शेती त्याचबरोबर तापमानात होणारी वाढ व अवेळी होणारा पाऊस आणि त्यामुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान या सर्व गोष्टीसाठी फळबाग फार महत्त्वाची आहे.
सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी सहाय्यक सौ. एस. आर. बेहेरे – ढगे यांनी केले.

सदरील कार्यक्रमात कृषि पर्यवेक्षक श्री. काळे साहेब, कृषि सहायक सौ. स्वाती बेहेरे व मार्गदर्शक म्हणून प्रा. ढगे सर, ग्रामपंचायत सदस्य अमोल कांबळे नामदेव मोकासवार कपिल कांबळे प्रगतशील शेतकरी सुनील वानखेडे, साईनाथ शिंदे,सुदेश कांबळे गोविंद गोखले, संभाजी मोरे, डाके सर, बालाजी मोरे, रघुनाथ वाडेकर, महिला शेतकरी सुधा नरवाडे, शिलाबाई थोरात,चंद्रकला वानखेडे, राधिका वानखेडे,व इतर शेतकरी बांधव उपस्थित उपस्थित होते.

Previous article*संवाद हा नात्यांचा श्वास*
Next article*जगणं*