Home Breaking News मराठेशाहीच्या इतिहासातील सुवर्ण पान म्हणजे होळकरशाही- व्याख्याते लक्ष्मण नजान

मराठेशाहीच्या इतिहासातील सुवर्ण पान म्हणजे होळकरशाही- व्याख्याते लक्ष्मण नजान

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़
मो. नंबर – 8983319070

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा मुक्त विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर मध्ये होळकर शाहीच्या साहित्यावर पीएचडी करणारे आणि पाटोदा, बीड येथून आलेले व्याख्याते लक्ष्मण नजान सर यांनी नाशिक मधील अहिल्या जन्मोत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या व्यक्तिमत्त्वांचे अनेक पैलू आपल्या खास शैलीत कथन केले.

आठराव्या शतकातील हिंदुस्थानच्या एकोणीस सुभ्यांपैकी अठरा सुभ्यावर पुरुष राज्यकारभार करत असताना महाराष्ट्राच्या उत्तरेला असलेल्या माळवा या सुभ्यावर महाराष्ट्रात जन्मलेल्या अहिल्यादेवी या एकमेव महिला शासक राज्यकारभार करत होत्या. शिवाय त्यांचा राजकारभार हा लोककल्याणकारी होता. अहिल्यादेवी होळकर यांना समाज उपयोगी कार्यासाठी कुठल्याही राज्याच्या सीमा आडव्या आल्या नाहीत. त्यांचे प्रजाहित कार्य जसे उत्तर भारतात होते तसेच ते दक्षिण भारतातही आढळून येते. त्यांच्या कौटुंबिक आयुष्यात त्यांच्यावर दुःखाचे डोंगर कोसळले पण तरी त्या नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्वासाठी कधीच थांबल्या नाहीत.

‘द मराठाज’ या पुस्तकात अमेरिकन इतिहासकार डॉक्टर स्टुअर्ट गॉर्डन अहिल्यादेवी बाबत लिहितो की, अहिल्यादेवी या आठराव्या शतकातील मराठ्यांच्या इतिहासात असामान्य नेतृत्व गुण लाभलेल्या महिला शासक होत्या. त्या मुलकी व्यवस्थित व लष्करी व्यवस्थित पारंगत होत्या.
यासारखी अहिल्यादेवी बाबतची महत्त्वपूर्ण माहिती लक्ष्मण नजान सर यांनी आपल्या अमोघ वाणीतून श्रोत्यांना देत असतानाच अठराव्या शतकातील स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते, मरण आले तरी बेहत्तर पण दिलेला शब्द पाळणारे, परस्त्रियांचा सन्मान करणारे ,पेशवाईतील एकमेव अंधश्रद्धा न पाळणारे,

मराठ्यांच्या पराक्रमाचा झेंडा अटकेपार फडकवण्यात सिंहाचा वाटा असलेले व होळकरशाहीचे संस्थापक मराठावीर मल्हारराव होळकर यांचे अनेक पैलू परदेशी इतिहासकाराचा दाखला देत लक्ष्मण नजान सरांनी श्रोत्यापुढे उलगडले.
मल्हारराव होळकर हे अहिल्यादेवीना मुलगाच मानत शिवाय ते अहिल्यादेवींचे राजकीय गुरु होते हे त्यांनी अनेक संदर्भ देत आपल्या व्याख्यानातून सांगितले.
त्याप्रसंगी सोहळ्याचे संयोजक समाधान भाऊ बागल प्रास्ताविक केली समिती अध्यक्ष ऋषिकेश धापसे यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले व नियोजन समिती सदस्य यांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते

ज्या प्रसंगी तळोदा संस्थांची जाहीरदार अमरजीत दादा बारगळ, व्याख्याते लक्ष्मण नजन सर भक्ती चरणदास महाराज सरदार घराणे वंशज भाऊसाहेब राजोळे, अहिल्यादेवी चित्रपटाचे दिग्दर्शक व त्यांची सर्व टीम व त्या ठिकाणी चित्रपटाचे प्रमोशन करण्यात आले. हा सगळा मोठ्या उत्साहात पार पडला तसेच युवराज यशवंतराव होळकर यांनी पॅरिसोन नासिक ठिकाणी सर्व नाशिककरांना आईला जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच इंदोर वरतून नर्मदेचे पाणी एकत्र करून अहिल्यादेवी चे अभिषेक करण्यात आला

Previous articleतालुक्याला अभ्यासु कृषिपर्यवेक्षक मिळाला हे आमच्या शेतक-याचे भाग्य.
Next articleजमिनीच्या वादाला कंटाळून यांची विष घेऊन आत्महत्या