योगेश घायवट जिल्हा प्रतिनिधी अकोला
अकोला : बेपत्ता झालेल्या एका व्यक्तीबाबत पातूर पोलिसांनी खळबळजनक खुलासा केला होता. बेपत्ता झालेल्या या व्यक्तीची त्याच्याच पत्नीनं आणि तिच्या प्रियकरानं हत्या केल्याचं उघड झालं होतं. ही आत्महत्या असावी असं भासवण्यासाठी पतीचा मृतदेह विहिरीत फेकून दिलं. लोकांना हे कळू नये म्हणून पतीला मारल्यानंतर पत्नीनेच आपला पती बेपत्ता आहे, अशी तक्रार पोलिसात दाखल केली होती. पण काही दिवसांनी आलेल्या एका रिपोर्टने पत्नीचा खेळ खल्लास झाला.
काही दिवसानंतर वैद्यकीय अहवालात आला आणि महिलेच्या पतीची हत्या झाल्याचं समोर आलं अन् नातेवाईकांच्या पायाखालची जमीन सरकली. प्रेमसंबंधात पती अडसर ठरत असल्यानं प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा हा संपूर्ण कट रचल्याचं उघड झालं. पातूर पोलिसांनी पत्नी आणि प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली. सात महिन्यांपासून दोघेही कारागृहात होते. आता त्यांना सरकारी खर्चातून वकिलांची मदत देण्यात आल्यानंतर दोन्ही आरोपींची बाजू त्यांनी न्यायालयात मांडली. सुनवाणीनंतर न्यायालयानं आरोपींना जामीन मंजूर केलाय.
हे संपूर्ण प्रकरण आहे साधारणतः ९ डिसेंबर २०२२ च्या आधीचं. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातल्या आलेगाव येथील शाम खुळे यांच्या कार्ला शेतशिवारातील शेतात बंडू आत्माराम डाखोरे (वय ४५, रा. सावरगाव) नावाचे व्यक्ती हे काम करायचे. अन् तिथेच रखवालदार म्हणून राहायचे. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी मीरा (वय ३५) देखील राहायची. दरम्यान, ९ डिसेंबरच्या काही दिवसांपूर्वी बंडू हे बेपत्ता झाले. याबाबत त्यांची पत्नी मीरा डाखोरे यांनी पातूर पोलीस ठाण्यात पती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. बेपत्ता असलेले बंडू यांचा कार्ला शेतशिवारातील विहिरीत सावरगाव इथे म्हणजेच ९ डिसेंबर २०२२ रोजी मृतदेह आढळून आला होता. बंडू यांनी आत्महत्या केली असल्याचं यावेळी प्राथमिक दर्शनी दिसून येत होतं. दरम्यान, वैद्यकीय अहवालात त्या व्यक्तीची हत्या झाल्याचं निष्पन्न झालं. या प्रकरणी पातूर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान धक्कादायक माहिती गोष्टी उघड होत गेली. पत्नी आणि तिच्या प्रियकरानं संगणमत करून पतीची (बंडू) हत्या केल्याचं उघड झालं.
मृत बंडू डाखोरे अन् त्याची पत्नी मीरा या दोघांचेही गजानन शेरू बावणे या व्यक्तीसोबत चांगले संबध होते. गजाननचे बंडूच्या घरी नेहमी येणं जाणं होतं. त्यातून मीरा आणि गजानन यांची चांगली मैत्री झाली अन् मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. या प्रेमाची कुणकुण तिच्या पतीला म्हणजेच बंडूला लागली होती. त्यातून दोघे पती-पत्नीमध्ये सतत वाद व्हायचे. अखेर पत्नीनं पतीचा काटा काढण्याचं निश्चित केलं, असं पोलिस तपासात समोर आलं होतं.
गजानन आणि मृत बंडू हे दोघेही हत्येच्या दिवशी सोबत दारू पिण्यासाठी शेतात बसले. यावेळी गजानन याने ओढणीने बंडूचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्याने आत्महत्या केली असावी, असं भासवून देण्यासाठी बंडूच्या आत्महत्येचा बनाव रचला. ज्या शेतात त्यांची पार्टी सुरू होती, त्याच शेताजवळच्या विहिरीत बंडू यांचा मृतदेह फरफटत नेऊन विहिरित फेकून दिला. अन् आत्महत्या असल्याचं सांगितलं.