👉 कृ.उ. बा. समितीने आक्रमक भूमिका घ्यावी.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- २ जुन 2023
हिमायतनगर तालुक्यातील बळीराजाची दशा आणि दिशा… सांगणारी हि बातमी. गेले वर्षीचा खरीप हंगाम पुर्णतः वाया गेला. कसा बसा कापुस शेतकऱ्यांच्या घरात आला. पण.. सुरूवातीला 9200 -9500 प्रयत्न भावात वाढ झालेली दिसून येत असताना, आजतागायत 6500 ते 7100 यावरच प्रतिक्विंटल दर हिमायतनगर बाजारात शेतकऱ्याचा कापुस विकत घेतांना दिसत आहेत. त्यात क्विंटलला 1 किलो कट्टी, हमाली, पुर्ण माल ( कापुस) गाडी खाली झाल्यावर शेतकऱ्यांचा कापुस व्यापारी बांधवांना पुन्हा पिवळा दिसतो. पुन्हा प्रतिक्विंटल ला 300 दर कमी इथे मनमानी व्यापारी बांधवांची…
तसेच हळद या पिकाला शेतकऱ्यांनी नगदी पिक म्हणुन अतिशय जोमात पिंक घेतले. पण… निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या जिवणामरणाशी आज खेळतो आहे. कारण… हिमायतनगर तालुक्यातील व्यापारी बांधवांचा शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मनमानी दर हे व्यापारी ठरवतात.
आज हळदीचा नमुना दाखविला की शेतकऱ्यांना जाम खुश करण्यासाठी 6100 रूपये प्रति क्विंटल व्यापारी दर सांगतात. पण अडीअडचनीस्तव शेतकरी आज भाव ठरवुन उद्या हिमायतनगर बाजारात माल गेला की, त्यांच शेतकऱ्यांच्या हळदीचा दर 5600 होतो. त्यात प्रतिक्विंटल १ किलो कट्टी, हमाली प्रति क्विंटल २० रुपये. अक्षरशः एका शेतकऱ्यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले. साहेब माझे नांव सांगु नका….पण तुमच्या पेपरच्या माध्यमातून आम्हा शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या.
व्यापारी म्हणतात जो धारा चालु आहे. तो देवावाच लागेल. तोंडघशी पडलेल्या शेतकऱ्यांच्या मनात पावसात भिजून चिंब भिजून हळदिचे केलेले संरक्षणासाठी अहोरात्र प्रयत्न वयापा-याच्या दबावापोटी निरागस चेहरा ठेवुनी म्हणावे लागते. शेठजी असं नका नाहो करु….खुप मेहनत घेतली हो आम्ही….
हिच परिस्थिती दिवसा- ढवळ्या हिमायतनगर बाजारपेठेतील शेतकऱ्यांची लुट शेतकरी कदापी खपुन घेणार नाहीत. पण या चानाक्ष व्यापा-यांना हिमायतनगर तालुक्यातील शेतकरी धडा शिकविलयाशिवाय राहणार नाहीत. शेतकऱ्यांचा माल कवटीमोल दराने घेऊन, कच्ची पावती देणा-या शेतकऱ्यांची हळद खरेदी करणा-या व्यापारी बांधवाना , नवनिर्वाचित हिमायतनगर कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती आणि सर्व संचालक मंडळाची काय? भुमिका राहिल. यावर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कामगिरीवर तालुक्यातील शेतकरी बांधव कटाक्षाने लक्ष वेधून आहेत. या शहरातील व्यापाऱ्यांना वेळीच आळा घातला नाही तर आगामी निवडणुकीत शेतकऱ्यांच्या भुमिकेचा कुणीही अंत पाहू नका. अशी हळद उत्पादक शेतकऱ्यांची बोलकी प्रतिक्रिया एका व्यापाऱ्यासमोर अनेक शेतकऱ्यांनी बोलवुन दाखविली आहे.