Home Breaking News श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे आज वाडेगावात आगमन

श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे आज वाडेगावात आगमन

योगेश घायवट जिल्हा प्रतिनिधी

वाडेगाव :- श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव येथुन पंढरपूरसाठी ५४ व्या वारीकरीता निघालेल्या पालखीचे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दि ३० मे मंगळवारी रोजी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान वाडेगाव नगरीमध्ये आगमन होणार असून, जि प शाळा मैदान येथे रात्रीच्या मुक्कामाकरिता थांबणार आहे.
पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी देवदर्शनचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
या मध्ये घोडे हत्ती दिंड्या पताकांसह ७०० वारकऱ्यांचा सहभाग असलेली माऊलींची पालखी दिंडी अकोला येथून गोरेगाव भरतपूर नकाशी मार्गे वाडेगाव येथे आगमन होणार असुन, पालखी सोहळ्याचे पालखी सोहळा प्रमुख व गावकरी तसेच गावातील ह भ प वारकरी मंडळ यांच्यावतीने भावभक्तीने पालखीचे स्वागत करण्यात येत आहे.,जि प शाळा मैदान वाडेगाव येथे माऊलीच्या पालखीचा मुक्काम राहणार आहे. तरी सर्व भाविकांनी पालखीतील श्री संत गजानन महाराज यांच्या रजत मुखवट्याचे दर्शनाचा घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. बुधवारी सकाळी ५ वाजता माऊलीच्या पालखीचे देऊळगाव मार्गे पातुर कडे प्रस्थान होणार आहे.

Previous articleराजमाता अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळा अहिल्याघाट, रामकुंड, पंचवटी, नाशिक येथे होणार साजरा
Next articleहळद उत्पादक शेतकऱ्यांची व्यापा-याकडुन लुट!