Home Breaking News कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री धनगर समाजाचे सुपुत्र सिध्दरामय्या !

कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री धनगर समाजाचे सुपुत्र सिध्दरामय्या !

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़
मो. नंबर – 8983319070

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा अखेर झाली , राज्यातील ओबीसी आणि मागासवर्गीयांचे प्रभावशाली नेते म्हणून ओळख असलेल्या सिध्दरामय्या यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली. या निवडीनंतर कर्नाटकसह महाराष्ट्रातील सीमावर्ती भागातील धनगर समाजात उत्साहाचे वातावरण आहे. यापूर्वी सिध्दरामय्या यांनी २०१३ ते २०१८ अशी सलग पाच वर्षे मुख्यमंत्री पद भूषविले आहे. कर्नाटकच्या राजकारणात मागील चाळीस वर्षात सलग पाच वर्षे संधी मिळालेले ते एकमेव मुख्यमंत्री आहेत.

म्हैसूरजवळील वरूणा या त्यांच्या पारंपरिक मतदारसंघातून ते विजयी झाले आहेत. वकिलीचे शिक्षण घेतलेले सिध्दरामय्या हे राज्यात मास लीडर म्हणून ओळखले जातात. यापूर्वी कर्नाटकात त्यांनी उपमुख्यमंत्री , प्रदेशाध्यक्ष , विरोधी पक्षनेते अशा पदांवर काम केले आहे. ते सलग तेरा वर्षे अर्थमंत्री होते त्यावेळी सलग तेरा वर्षे अर्थसंकल्प मांडण्याच्या विक्रमाची नोंद गिनीज बुकात आहे. ते कर्नाटकातील दबंग नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. कर्नाटकच्या विधानसौदेच्या सभागृहातील त्यांची अनेक भाषणे गाजली आहेत.

सिध्दरामय्यांच्या आक्रमकतेचा हा प्रसंग कर्नाटकात आजही लोक विसरले नाहीत !

येडीयुरप्पा मुख्यमंत्री असताना सिध्दरामय्या विरोधी पक्षनेते होते , त्यावेळी एका संवेदनशील विषयावर विरोधी पक्ष सभागृहात आक्रमक झाला होता. हा गोंधळ पाहून सत्ताधारी गटाने सभागृहात पोलीसांना बोलावून आक्रमक झालेल्या आमदारांना ताब्यात घ्यायला लावले होते. मुळात देशातील कोणत्याच कायदेमंडळाच्या सभागृहात पोलीस कारवाई करता येत नाही. मार्शलकडून कारवाई केली जाते. पण त्यावेळी कर्नाटकच्या विधानसभागृहात आमदारांना ताब्यात घेण्यासाठी आयपीएस अधिकारी आले होते. विरोधी पक्षनेते असलेल्या सिध्दरामय्यांनी ‘ तुमच्या अंगावर वर्दी आहे म्हणून मान राखतोय नाहीतर बुटासहीत लाथ घालून बाहेर हाकललं असतं ‘ अशी गर्जना केली आणि पूर्ण सभागृह अवाक् झाले. आजही राज्यात हा प्रसंग लोकांच्या मनात कायम आहे. त्यादिवशी आक्रमक विरोधी पक्षनेत्याचा रूद्रावतार पाहून सभागृहाच्या भिंतीही थरारल्या.

Previous articleआरपीएफ अधिकाऱ्यांच्या या धाडसी कृत्याचं सर्वत्र कौतुक केलं जातं आहे…
Next articleग्रामपंचात संभापूर येथील महिलांना अहिल्या देवी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार…