Home Breaking News पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, पुष्परत्न साहित्य समूह नाशिक प्रथम वर्धापन दिन सोहळा...

पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, पुष्परत्न साहित्य समूह नाशिक प्रथम वर्धापन दिन सोहळा व पुरस्कार सोहळा

एकदिवशीय मराठी साहित्य संमेलन प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री मेघा घाडगे
नाशिक

हेमंत शिंदे -नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़
मो. नंबर -8983319070

पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था पुष्परत्न साहित्य समूह प्रथम वर्धापन दिन सोहळा व पुरस्कार सोहळा त्यानिमित्त एक दिवशीय मराठी साहित्य संमेलन रविवार दिनांक 4 जून 2023 रोजी नाशिक येथे भव्य दिव्य आयोजन केलेले आहे. या संमेलनाचे प्रमुख पाहुणे मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री मेघा घाडगे उपस्थित राहणार असून त्यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्र, विविध क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या कार्यवीरांचा यथोचित सन्मान होणार आहे.
सुप्रसिद्ध अभिनेत्री मेघा घाडगे यांना आदर्श अभिनेत्री म्हणून पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नाशिक विशेष पुरस्काराने यथोचित सन्मानाने गौरविणार आहे सन्मानाचे स्वरूप रोख ५००१/- रुपये आकर्षक सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, मानाची शाल, ग्रंथ असे असणार आहे.
एकदिवशीय मराठी साहित्य संमेलन मध्ये महाराष्ट्रातील विविध कवी कवयित्रींच्या कवितेचे पोस्टर पोएट्री प्रदर्शन भरविण्यात येणार असून ते सर्व नाशिककरांना बघण्यासारखे असेल तसेच पुष्परत्न वार्षिक अंक प्रकाशित होणार आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील कवी कवयित्रींच्या कविताही प्रकाशित होणार आहे. महाराष्ट्रातील विद्वान, विचारवंत, साहित्यिक, कवी, कवयित्री तसेच चित्रपट क्षेत्रातील व साहित्य क्षेत्रातील दिगजांच्या विचारांची मेजवानी सर्वांना मिळणार आहे.
महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील कवी,कवयित्री साहित्यिक,विचारवंत, लेखक, प्रकाशक, वाचक,या साहित्य संमेलनास उपस्थित राहणार आहेत अशी माहिती पुष्परत्न साहित्य समूह अध्यक्ष,प्रा. डॉ.आनंद रत्नाकर आहिरे यांनी दिली.

Previous articleश्रध्देय ॲड बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत वाडेगाव येथे पार पडला अंतिम सामना
Next articleहिमायतनगर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी ताडेवाड तर उपसभापतीपदी कदम यांची एकमताने निवड.