Home Breaking News ॥आई॥

॥आई॥

आ =आत्म्यातील   ई = ईश्वर

आई,
आईला, नेहेमीच गृहीत धरलं जातं,
असेल ती कायम, असचं वाटत रहातं.

एक दिवशी, जेव्हा डोळे उघडतात,
तेव्हा काहीचं आपल्या हातातं नसतं

सांगायचं,बोलायचं सगळं मनातचं रहातं,
मन आपलं मग मिटूनच जातं.

खरंतरं मन सारखं उदासच असतं,
डोळ्यातून जरी रोज पाणी येतं नसतं.

आयुष्याचं रहाटगाडगं वहातचं असतं,
आपलं रोजचं जगण चालूचं असतं.

पण मधूनचं काही चांगल घडतं,
आठवणींचे ढग मग घेऊन येतं.

जुन्या जखमा, परत ओल्या होतात,
पावसाच्या झडी वर झडी झडतात.

मन एकटचं बिचार्र भिजत रहातं,
स्वतःची आसवं त्यातं मिसळत रहातं.

कॅलेंडरची पाने, अशी फडफडत रहातात,
वर्षामागून वर्षे, कशीतरी जातचं रहातात.

आयुष्य पुढे, पुढे, सरकतच रहातं,
मनं आपले, आपल्यालाचं समजवत रहातं.

उणीव ही कधीही, भरून नाही निघतं,
समजूतीची समजूत, कधीच नाही पटतं.

म्हणूनच आता, कुणाला गृहीत नाही धरत,
मनाची कुपी बंदच नाही ठेवतं.

प्रेमाचा दरवळ, पोहचू दे समोरच्यापर्यंत,
अन् गारवा मनाचा, अनुभवू दे वेळ असेपर्यंत.

नाहीतर आयुष्य सरले तरी सल नाही सरत,
पूर्वीसारखे मैफिलीत रंगचं नाही कधी भरतं ….
©- रश्मी पांढरे.

Previous articleउमरी जहागीर येथे धर्मवीर संभाजी राजे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी……
Next articleअहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव साजरा करण्यासाठी मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्री चौंड़ीत येणार