Home Breaking News कर्नाटकात काँग्रेसने एकहत्ती सत्ता मिळविल्याने हिमायतनगरात फटाके फोडून जल्लोष…

कर्नाटकात काँग्रेसने एकहत्ती सत्ता मिळविल्याने हिमायतनगरात फटाके फोडून जल्लोष…

👉🏻आमदार जवळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली विजयाचा आनंद उत्सव साजरा…

अंगद सुरोशे भुमीराजा हिमायतनगर /प्रतिनिधी

संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने एक हत्ती विजय मिळवला आहे त्यामुळे हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि 13 मे रोजी सायंकाळी हिमायतनगर शहरातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी श्री परमेश्वर मंदिर समोर फटाके फोडून कर्नाटक येथील काँग्रेसच्या विजयाचा आनंद उत्सव साजरा केला….

महाराष्ट्रात सह संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 224 जागांसाठी दहा मे रोजी मतदान घेण्यात आले होते आज झालेल्या मतमोजणीत विविध संस्थांनी मतमोजणीपूर्वी व्यक्त केलेले अंदाज खरे ठरवत येथील भारतीय जनता पक्षा ला मोठा धक्का देत हा विजय मिळवीला आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सह केंद्र व राज्यातील मोठमोठ्या पुढार्‍यांनी कर्नाटक विधानसभे मध्ये येऊन प्रचार करूनही तेथील मतदारांनी भाजपा ला तुल्य मतात रोखून धरले या निवडणुकीत काँग्रेसला बहुमतासाठी 113 जागांची गरज असताना त्यांना 136 जागांवर काँग्रेसचे विजय मिळवला आहे जनता दलने वीस जागा मिळविल्या आहेत कर्नाटकात काँग्रेसला मिळालेल्या घवघवीत यशाचा आनंद हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हिमायतनगर येथील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी श्री परमेश्वर मंदिर समोर फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करताना माजी जि.प.सदस्य सुभाष दादा राठोड,काँग्रेस शहराध्यक्ष संजय माने, मा. संचालक गणेशराव शिंदे,माजी सभापती डॉ.प्रकाश वानखेडे, प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल भाई, माजी सभापती परमेश्वर गोपतवाड, गजानन सुर्यवंशी सर, सुभाष शिंदे,संजू पाटील दुधडकर, राजेश चिकनेपाड,माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे,ॲड.अतुल वानखेडे, सुनिल दादा वानखेडे,रमेश कदम, जयवंत पाटील,
संचालक आनंदराव देवकते,
आनंद मुतनेपावड,डॉ.गफार भाई, बालाजी पुठेवाड,हरीश गिरी,बबू पाटील,बबन कदम,माधव पालजकर, गोविंद बंडेवार,शे.रहीम सेठ,बाकी भाई,
पापा पारडीकर,पंडित ढोणे अरविंद वानखेडे, बद्रीनाथ बुरकुले,नितीन पाटील, रोफ पठाण सह आदी असंख्य काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते…

Previous articleपातुर येथे मराठी पत्रकार संघाची आढावा सभा संपन्न
Next articleवादग्रस्त पोस्टवरून दोन गटात तुफान राडा, एकाचा मृत्यू; अकोल्याला छावणीचं स्वरूप