Home Breaking News विशाल मादसवार या युवकांचा उष्माघात ने घेतला बळी; अल्पवयात दुःखद निधन

विशाल मादसवार या युवकांचा उष्माघात ने घेतला बळी; अल्पवयात दुःखद निधन

अंगद सुरोशे भुमीराजा हिमायतनगर/प्रतिनीधी

हिमायतनगर। येथील सेवानिवृत्त मलेरिया डॉ रामराव मादसवार यांचे तृतीय चिरंजीव विशाल रामराम मादसवार यांचं वयाच्या 28 व्या वर्षी दुःखद निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने मादसवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

गेल्या काही दिवसाच्या अवकाळी पावसाने वातावरण गार झाले होते. त्यानंतर में हिटची सुरुवात झाली असतांना उन्हाचा पारा 42 अंश सेल्सिअस पेक्षा अधिक झाला आहे. त्यामुळे उष्णतेत वाढ होऊन उन्हाचे चटके असहाय होऊ लागले आहेत. अश्यात नेहमीप्रमाणे शेतकरी शेती कामात व्यस्त आहेत. अश्याच शेतीकामासाठी दि.12 रोजी हिमायतनगर येथील युवक रामराव मादसवार शेतीत गेला होता. दिवसभर शेती काम करून सायंकाळी 6 वाजता घरी परत आल्यानंतर जेवण केलं. सकाळी नेहमीप्रमाणे पैरलेसीसचा अटॅक आलेल्या वडिलांची सेवा केली. आणि अचानक अस्वस्थ वाटू लागल्याचे सांगताच उलटी झाली.

त्यामुळं नातेवाईकांनी तात्काळ शहरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी विशालला मृत घोषित केले. विशाल मादसवार यांच्या उष्माघात होऊन नॉर्मल अटॅक होऊन
मृत्यू झाल्यामुळे कुटुंबातील सदस्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला. याची माहिती मिळताच सर्वत्र शोककळा पसरली असून, नातेवाईक आप्तस्वकीय व मित्रांनी विशालच्या शेवटच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. मयत विशाल मादसवार यांच्या पार्थिवावर सायंकाळी 5 वाजता हिमायतनगर शहरातील बोरगडी रोडवर असलेल्या वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Previous article*कविता*
Next articleपातुर येथे मराठी पत्रकार संघाची आढावा सभा संपन्न