Home Breaking News पोलिस अधिक्षक मा. सुनील कडासने साहेब ” समाज भूषण पुरस्काराने ” सन्मानित....

पोलिस अधिक्षक मा. सुनील कडासने साहेब ” समाज भूषण पुरस्काराने ” सन्मानित. – डॉ. संघर्ष सावळे

शितल शेगोकार भूमीराजा अँकर प्रतिनिधी

साहित्यधारा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, औरंगाबाद आयोजक : डॉ. संघर्ष सावळे , प्रबुद्ध हो मानवा संघर्षातून उत्कर्षांकडे “२५८५ वी बुद्ध जयंती उत्सवा निमित्ताने दि. 29 एप्रिल संभाजी नगर येथे बुद्ध जयंतीचे औचित्य साधून राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याच्या निमित्ताने एस. पी. साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्यांना *‘ समाज भूषण ’ *पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. साहेब एक आदर्श व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जातात. समाजात आदर्श व्यक्ती कशी असावी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न काय होते ? या विषयी त्यांनी चर्चा केली.* डॉ. संघर्ष सावळे यांनी नावा प्रमाणे संघर्ष केला या बद्दल साहेबांनी त्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तसेच आज दि. 11 मे 2023 रोजी मा. डॉ. संघर्ष सावळे यांनी बूलढाना येथे जाऊन नव नियुक्त पोलिस अधिक्षक मा. सुनीलजी कडासने साहेब यांचे स्वागत केले .

Previous articleमहाराजा यशवंतराव होळकर शौर्य यात्रेचे मनमाड येथे उत्साह व जल्लोषात स्वागत
Next articleआमदार माधवराव पाटील जवळगावकर सारखा लोकनेता आपलाला मिळाला!