Home Breaking News दारू विक्रेत्यांनी केली पत्रकारास मारहाण……

दारू विक्रेत्यांनी केली पत्रकारास मारहाण……

तलवार काढून जीवे मारण्याची धमकी…. खडकी तांडा /बाजार येथील घटना.!

रवी पवार ग्रामीण प्रतिनिधी भूमीराजा

हिमायतनगर /-
तालुक्यातील हाकेच्या अंतरावर असणाऱ्या खडकी बाजार तांडा येथे रात्रंदिवस दारू विक्री जोमात चालू आहे. तरी याकडे पोलीस प्रशासन व उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांचे पूर्णतः दुर्लक्ष दिसून येत आहे.
सविस्तर वृत्त असे की, खडकी तांडा येथे असलेल्या वज्रधारी दाबा येथे दि.८ मे रोजी रात्री ८:३० सुमारास एक अवैध दारू विक्रीची गाडी आली असता दैनिक बाळकडू चे तालुका प्रतिनिधी रविकुमार पवार दुकानाकडे जात असताना त्या गाडीस सहज पत्रकारांनी विचारपूस केली की ही गाडी कशाची आहे. या एवढ्याच कारणावर वज्रधारी ढाब्याचे मालक वसंत अमरसिंग राठोड व त्याचा मुलगा रोहित वसंतराव राठोड वय – 23 वर्ष या तरुण युवकांने तू या आमच्या दारू विक्रेत्या डीलर ला का विचारपूस करत आहेस म्हणून अचानक पाठीमागून लात मारून मोबाईल हिसकावून रोडवर मोबाईल फेकून फोन चकणाचूर केले व पत्रकारांस बेदम मारहाण केली.तेवढ्यायात त्यांनी तलवार काडून तुला पूर्णतः जीवे मारतो अशी धमकी देत तुला काय करायचे ते कर मी असाच ढाबा व दारू विक्री चालवत नाही तर हिमायतनगरच्या पोलीस प्रशासनाला हप्ता देतो मी का फुकट दारू विकत नाही असे म्हणत त्यांनी रविकुमार पवार यांना जबर मारहाण केली.
खडकी तांडा येथे तांड्यातील गाव हद्दीत गायरान जमिनीवर त्यांचा’ वज्रधारी ‘या नावाने त्यांचा धाब्यात दारू विक्री चालते.या त्याच्या दारू विक्री मुळे तांड्यातील अल्पवयिन तरुण पिढी व्यसनधीन होत आहे..
माझे वडील पत्रकार आहे वसंत राठोड आम्ही जागोजागी हप्ते देतो असे म्हणत त्यांची अरेराई अजून तरी तांड्यात चालू आहे असे तांड्यातील सुजाण नागरिकांचे म्हणणे आहे.

वसंत राठोड हे मागील 10ते 15 वर्षा पासून पत्रकार सामाजिक कार्यकर्ता म्हणून कार्य करत आहे. पण त्यांचा गैरफादा म्हणून तो स्वतःच गावठाणाच्या हद्दीत गायरान जमिनीवर ढाबा व अवैध दारू विक्री त्यांनी पाच ते सहा वर्षापासून चालू केले आहे आहे.
या त्यांच्या दारू विक्रीमुळे तांड्यातील कित्येक घरांचे संसार उध्वस्त झाले आहे. जो कोणी याविषयी प्रश्न मांडला असता त्यांनी अशाच प्रकारे मागील काही काळात काही व्यक्तींना अशाचप्रकारे मारहाण केली होती.. असे कित्येक दिवस चालणार तरुण पिढी व्यसनाधीन होऊन उध्वस्त होत आहेत. याकडे प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन तरुण पिढीचे संसार उध्वस्त होण्यापासून वाचवावे. असे दैनिक बाळकडू चे तालुका प्रतिनिधी पत्रकार रवीकुमार पवार च्या समवेत गावकऱ्यांची कळकळीची विनंती आहे.
व पत्रकार रवीकुमार पवार यांना त्यांनी मारहाण केल्याचे धाब्याचे मालक वसंत राठोड व रोहित वसंत राठोड यावर दंडात्मक कारवाई व्हावी असे पत्रकार रविकुमार पवार यांच्या कुटूंबियांनी बोलताना सांगितले आहे.

Previous articleशब्दवेधी बाणाक्षरी समूह पुणे राज्यस्तरीय काव्य संमेलन,पुरस्कार सोहळा दमदार संपन्न
Next articleमहाराजा यशवंतराव होळकर शौर्य यात्रेचे मनमाड येथे उत्साह व जल्लोषात स्वागत