Home Breaking News शब्दवेधी बाणाक्षरी समूह पुणे राज्यस्तरीय काव्य संमेलन,पुरस्कार सोहळा दमदार संपन्न

शब्दवेधी बाणाक्षरी समूह पुणे राज्यस्तरीय काव्य संमेलन,पुरस्कार सोहळा दमदार संपन्न

शितल शेगोकार प्रतिनिधी भूमीराजा न्युज

पुणे (७ मे)शब्दविधी बाणाक्षरी समूह आयोजित कवी संमेलन आणि साहित्यिक व विधायक कार्यात समाजसेवकाचा सन्मान मान पत्र , स्मुर्तीचीन्ह देवून सन्मान बाणाक्षरी समूह संस्थापक संचालक रागिणी जोशी वाढदिवसा निमित्त दिनांक ७ मे २०२३ला आयोजन पत्रकार भवन पुणे येथे करण्यात आला. कवी संमेलनाचे उदघाटन साहित्यिका मा.मानसी ताई जोशी , कवी संमेलन अध्यक्ष अरुण पुराणीक,मा.राधिका ताई भांडारकर ,प्रमुख पाहुणे डॉ. सागर गुडमेवार प्रमुख वक्ते आनंद , प्राचार्य पंढरीनाथ शेळके ,बुलढाणा, समूह संस्थापक सौ.रागिणी जोशी व सह संचालिका सौ. सोनाली जगताप सर्व मान्यवरांच्या हस्ते उद् घाटन दीप प्रज्वलन करून संपन्न झाले. प्रारंभ रागिणी जोशी लिखित* “गणेश पूजन*या रागिणी जोशी लिखीत गीतावर नृत्य, सौ.सुरेखा बडवे दिग्दर्शन, सहभागी कलाकार सौ सुरेखा बडवे, सौ रंजना वेदपाठक ,सौ. माधुरी श्रीखंडे ,सौ स्मिता देशपांडे ,श्रीमती सोनाली शेलार, व सौ लता जवंजाळ, श्रीमती विनीता महाजन यांनी गणेश होऊन सर्वांची मने जिंकली .तसेच सौ रागिणी जोशी लिखीत गवळणी वर रागिणी जोशी यांच्या याच सर्व मैत्रिणींनी गवळण सादर केली,तसेच “गुटखा बंदी” हे भारूड ही सर्व मैत्रिंणींसह सादर केले यावेळी राधा क्लासेस च्या संचालिका अनुराधा मांडवकर त्यांच्या क्लासच्या शिष्या ,लहान मुलीनी लावणी सादर करून सर्वांना खिळवून ठेवले ,सुंदर सुंंदर गीतावर कथ्थक,गरबा नृत्य सादर केले.
सौ. रागिनी जोशी लिखित *शोध सुखाचा* या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सर्वांनीच शोध सुखाचा काव्यसंग्रह थोडा वाचून काव्यसंग्रह व त्याचे नाव व मुखपृष्ठ त्या काव्यसंग्रहासाठी योग्य आहे असे बोलत राजयुवा प्रकाशन चे गौरव पांडे यांचे ही कौतुक केले.
त्यानंतर सर्व जेठ कवींनी बाणाक्षरी काव्याचे भरभरून कौतुक केले व असे नव साहित्य साहित्यात आणा असे सांगितले
त्यानंतर शब्दवेधी बाणाक्षरी समूहात ने
हमीच सहभाग दर्शवणा-या विशेष कार्य करणाऱ्या मान्यवरांना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून मानपत्र ,सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला .मा. मानसी जोशी ,श्री अरुण पुराणिक ,मा.राधिका भंडारकर ,डॉ सागर गुडमेवार मा.आनंद ऊर्फ शशिकांत पुराणिक, बुलढाणा येथील प्राचार्य पंढरीनाथ शेळके यांचा सन्मान केला यावेळी रागिनी जोशी यांचा वाढदिवस बाणाक्षरी व इतर समूह सदस्य,अतिथी आणि महाराष्ट्रातून आलेले कवी व कवयित्री यांनी केक कापून विविध भेटवस्तू देऊन वाढदिवस साजरा केला. त्या नंतर सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला .
वाढदिवस संमेलनात साजरा करण्यामागे रागिणी जोशी यांची एकच भावना होती ती अशी की रसिक प्रेक्षक मिळावा, व त्यांचा अफाट मैत्रिवर्ग संमेलनात हजर होता हे विशेष
श्रोता नसेल तर कोणताही कार्यक्रम शून्य दर्जाचा असे रागिणी जोशी मानतात
दुसऱ्या सत्रात कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते सदर कवी संमेलनात सुरुवात प्रमुख पाहुणे संमेलनाध्यक्ष अरूण पुराणिक यांनी दु:खातही सुखी कसे राहावे हे कवितेतून सांगितले, . सौ मानसी मोहन जोशी मा. आनंद उर्फे शशिकांत पुराणीक यांनी गणेश. दि महानोर यांनी पाठ थोपटली कविता सादर केली व त्यांचे वडील कविता करत असंत व त्यांची आई कविता तुम्हांला काय देते जेवण देते का मसाला देते का! मसाला देते हे सांगणारी कविता उत्तम सादरीकरणाचे सादर केलीमा. राधिका भंडारकर, डॉ सागर गुडनेवार ,प्राचार्य डॉ पंढरीनाथ शेळके व समूह सहसंचालिका सोनाली जगताप इत्यादी मान्यवरांनी उत्तम कविता सादरीकरण सुरुवात केली.त्यानंतर सौ.करुणा कंद, तुकाराम डोके पाटील, श्रीमती अनुजा साळुंखे ,रोहित निकम नाशिक ,शैलेंद्र भणगे , दर्शन जोशी ,संजय पांचाळ, सुधा जाधव, , लक्ष्मीदेवी रेड्डी, मीना पाटणे व सौ सुरेखा बडवे ,सौ सुप्रिया लिमये नीं कविता सादरीकरण बरोबर मिमिक्री सादर केलीच पण रांगोळी काढून सर्वांची मने जिंकली, इतर कवी व कवयित्री यांनी सुंदर कविता सादर केल्या, रसिक वर्गही कार्यक्रमाला उपस्थित होता, रागिणी ताईंना सांस्कृतिक कार्यक्रमांत परत आणणा-या त्यांच्या लाडक्या आदरणीय संजीवनी ताई व श्री रावसाहेब उन्हाळे ,रेखा केळकर रेश्मा गांधी,नेहा जोशी, यांनीही हजेरी लावली होती,
समारोपीय कार्यक्रमात मान्यवरांनी मार्गदर्शन केले तर काव्य संमेलनाचे अध्यक्ष यांनी अध्यक्षीय भाषण केले त्यांनी काव्यप्रकार आणि शुद्धलेखना बाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुरेखा बडवे व वैभव दादा यांनी केले. आभार प्रदर्शन निमंत्रक समितीचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. पंढरीनाथ शेळके यांनी केले.मा. अध्यक्षाच्या भाषणानंतर सौ.रागिणी जोशी यांनी आभार मानून राष्ट्रगीताने दमदार काव्य संमेलन पुरस्कार वितरण सोहळ्याची सांगता झाली.
रागिणी ताईंच्या मैत्रिणींनी व कवयित्री करूणा कंद, योगेश हरणे, गौरव पांडे यांनी सकाळी वेळेत येऊन सर्वांचे स्वागत केले व कार्यक्रमाची शोभा वाढविली.

.

Previous articleहिमायतनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळाजी महाजन यांची धर्माबाद येथे बदली.
Next articleदारू विक्रेत्यांनी केली पत्रकारास मारहाण……