Home Breaking News सोनारी फाटा टोल नाक्याजवळ जीप पलटी झाल्याने 4 विद्यार्थिनी जखमी…

सोनारी फाटा टोल नाक्याजवळ जीप पलटी झाल्याने 4 विद्यार्थिनी जखमी…

जिल्हा संपादक नांदेड मारोती अक्कलवाड पा.सवनेकरदिनांक- 07 हे 2023

हिमायतनगर तालुक्यातील सोनारी फाटा ते पोटा च्या दरम्यान असलेल्या टोल नाक्याजवळ जीप पलटी झाल्यामुळे जीप मधील विद्यार्थिनी जखमी झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच सोनारी नगरींचे ग्रामस्थ व आजूबाजूच्या मंडळींनी तात्काळ सर्व जखमींना बाहेर काढले व हिमायतनगर येथील सेवा हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले आहे…
*याविषयी सविस्तर वृत्त असे कि पोटा वरून हिमायतनगर कडे येणारी भरधाव जीप क्रं. एम एच 06 ए एल 9333 ही जीप सकाळी 7:30 च्या दरम्यान टोल नाक्या जवळ अचानक पलटी झाल्यामुळे जीप मधील…* विद्यार्थिनी जखमी झाल्या आहेत. यात 6 विद्यार्थिनी होत्या त्यापैकी एका विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली आहे.यात *1) स्नेहा विलास जाधव 2) वेदिका पंडितराव जाधव 3)समृध्दी पंडितराव जाधव 4)ऋतूजा कोंडबाराव जाधव 5)पुनम राजेश्वर पतंगे व इतर* विद्यार्थिनींचा समावेश आहे.
उपचारासाठी त्यांना हिमायतनगर येथील सेवा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.जीप चालक आपल्याच धुंदीत गाडी पळवत होता असे विद्यार्थिनींचे म्हणणे आहे. यावेळी सर्व विद्यार्थिनींचे पालक उपस्थित होते.यावेळी हिमायतनगर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजिनाथ पाटील यांनी जखमी विध्यार्थिनींची दवाखान्यात जाऊन भेट घेतली.यावेळी *हिमायतनगर भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अध्यक्ष रामभाऊ सुर्यवंशी यांनी जखमींना…* दवाखान्यात भरती करन्यासाठी मदत केली व बेजबाबदार पणे गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हर वर गंभीर कार्यवाही करावी असे सांगितले.
पुढील घटनेची कार्यवाही पोलीस निरीक्षक बी डी भूषनूर *यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजिनाथ पाटील, अविनाश राचटवार व टीम हे करत आहे.वृत्त लिहीपर्यंत ड्रायव्हर वर कार्यवाही करणे चालू होते….

Previous articleचौथ्या लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनाचे उद्घाटन*
Next articleसबका मंगल हो’च्या जयघोषात तथागताला वंदन; वाडेगांव शहर भगवान बुद्ध यांची जयंती साजरी