Home Breaking News अवकाळी पावसामुळे हिमायतनगर येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान.

अवकाळी पावसामुळे हिमायतनगर येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान.

जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 06 हे 2023

गेल्या आठ दिवसांपासून सतत अवकाळी पाऊस पडतो आहे. त्यामुळे कांदा, हळद, उन्हाळी ज्वारी आदी पिकांचे अतोनात
नुकसान होत आहे. पावसाळ्या प्रमाणे जसा नाल्याला पुर येतो तसेच नाले तुडुंब भरून वाहत आहेत. शिजविलेल्या हळदीला अळ्या होत आहेत. आधीच सोयाबीनचे भाव पडले आहेत. कापुसाला भाव नाही. वरुन पाऊस पडतो आहे. अश्या मरणयातना शोशत बळीराजा पुढे संकटेच संकटे उभी राहिली आहेत. महसूल आणि कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांने त्वरीत नुकसान ग्रस्त मालाचे व पिकाचे पंचनामा करून, शेतकऱ्यांना आर्थिक जास्तीत जास्त मदत द्यावी. अशी मागणी प्रहारचे मा. जिल्हा प्रमुख बालाजी झरेवाड यांनी केली आहे.

Previous articleपत्रकारांसोबत गैरवर्तणूक करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील रणखांब यांना निलंबित करा
Next articleखामगाव- अकोला रस्त्यावरील रस्ता अपघातात एक जण जागीच ठार, तीन जखमी