Home Breaking News दाेन बाजार समित्यांसाठी मतदान सुरू

दाेन बाजार समित्यांसाठी मतदान सुरू

अकोला: जिल्ह्यात सात बाजार समित्यांसाठी २८ आणि ३० एप्रिल अशा दोन टप्प्यात मतदान हाेत

योगेश घायवट ता प्र.

अकोला: जिल्ह्यात सात बाजार समित्यांसाठी २८ आणि ३० एप्रिल अशा दोन टप्प्यात मतदान हाेत असून आज २८ एप्रिल राेजी अकोला, अकोट व बार्शीटाकळी या बाजार समित्यांसाठी मतदान शांततेत सुरू आहेकोरोनाकाळ आणि विविध अडचणींमुळे लांबलेल्या बाजार समितीच्या निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतर सहकार क्षेत्रात राजकारण तापले हाेते. अनेक प्रस्थापितांची प्रतिष्ठा यावेळी पणाला लागली आहे. प्रमुख राजकीय पक्षांनीही सहकाराच्या राजकारणात उडी घेतली असून सहकाराच्या नावाखाली राजकीय विराेधकही एकाच पॅनल मध्ये दिसत आहेत.
या निवडणुकीत जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या सदस्यांसह ग्रामपंचायतींमधील सरपंच, सदस्यांना मतदानाचा हक्क बजावता येत असून सेवा सहकारी संस्था मतदार, ग्रामपंचायत मतदार, व्यापारी-आडते, हमाल-मापारी मतदारांसाठी वेगवेगळे बूथ ठेवण्यात आले आहेत. अकाेल्यातील शिवाजी महाविद्यालयाच्या केंद्रावर सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या हाेत्या.दरम्यान उद्या ३० एप्रिल रोजी बाळापूर, तेल्हारा, पातूर व मूर्तिजापूर बाजार समितीसाठी निवडणूक पार पडेल. मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.

Previous articleशिक्षक भारतीच्या अल्टीमेटमची दखल
Next articleहिमायतनगर कृषि उत्पन्न बाजार समितीवर काॅग्रेसची एकहाती सत्ता!