या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आणि कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. नकार देऊनही आरोपी तरुणीच्या मागे लागला होता.
योगेश घायवट
अकोला : एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला करण्यात आल्याची घटना जिल्ह्यातील अकोट शहरात घडली. तू मला आवडते, मी तुझ्याशी लग्न करेन, तू माझ्याबरोबर ये, असा प्रस्ताव आरोपी तरुणाने एकतर्फी प्रेमातून तरुणीला दिला. पण तिने नकार देताच धारदार चाकूने तरुणीच्या मानेवर अन् शरीरावर वार केले. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली. हल्ल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. जखमी तरुणी रक्तबंबाळ अवस्थेत जागेवरच कोसळली. स्थानिक नागरिकांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर शस्त्रक्रिया पार पडली आहे. तिच्या मानेवर २५ टाके लागले आहेत. सद्यस्थितीत तिच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. तर आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे.