उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती
हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़
मो. नंबर – 8983319070
महिंद्राचा नवीन प्रकल्प विस्तार नाशिक मध्येच होईल. कुठेही अन्यथा प्रकल्प जाणार नाही.6.50 हजार कोटीची गुंतवणूक याद्वारे नाशिकला मिळणार आहे. तसेच नवीन उद्योगानाही मैत्री योजनेतर्गत 30 दिवसात परवानगी देण्यात येणार आहे. यातून उद्देश एकच की यातून रोजगार वाढावा, असे सामंत यांनी यावेळी सांगितले.
तसेच नाशिकला दिंडोरी – आक्रारे परिसरात रिलायन्स ला जागा दिली आहे.2100 कोटीची गुंतवणूक येणार आहे. तेथेच पिरामल प्रकल्पाचीही उभारणी होणार आसून 1200 कोटीची गुंतवणुक येईल. म्हणजे तब्बल 3300 कोटीची गुंतवणुक नाशिक मध्ये होणार असल्याचे त्यांनी सांगितले.