Home Breaking News धनेगावं येथील पंचशील ध्वज काढल्या प्रकरणात संतप्त बौद्ध समुहाची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक.

धनेगावं येथील पंचशील ध्वज काढल्या प्रकरणात संतप्त बौद्ध समुहाची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक.

योगेश घायवट तालुका प्रतिनिधी
तिढा निकाली निघेपर्यंत जैसे थे परिस्थिती ठेवा – जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधिक्षक ह्यांच्या सूचना.

अकोला – धनेगावं येथील पंचशील ध्वज काढल्या प्रकरणात संतप्त बौद्ध समुहाची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक. दिली होती वंचित चे नेते आणि जिल्हा परिषद पदाधिकारी ह्यांचे पुढाकाराने जिल्हा प्रशासनाने आज तातडीने नियोजन भवनात पोलीस प्रशासन व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आणि तिढा निकाली निघेपर्यंत जैसे थे परिस्थिती ठेवा, कुणीही कायदा हातात घेऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधिक्षक ह्यांनी केले.
तसेच टेम्पल कॉम्प्लेक्सच्या नावाने असलेल्या जागे बाबत ग्रामपंचायत ने निर्णय घेण्याचे आदेश पारित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी निमा अरोरा ह्यांनी स्पष्ट केले.

मौजे धनेगाव तालुका बाळापूर येथील बौद्ध मंडळींनी धार्मिक प्रयोजना साठी राखीव असलेल्या जागेवर इतर धर्मीय व बौद्ध समाजासाठी समान जागा राखीव करण्याची मागणी होती.मात्र जिल्हा प्रशासनाने तालुका प्रशासन ह्यांनी निर्णय घेतला नाही.
काल गावातील तरुणांनी पंचशील ध्वज स्थापित केला होता परंतु गावातील स्थानिक पोलीस पाटील आणि सरपंच यांनी बाळापुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार जुमळे यांच्याशी संगणमत करून पोलीस प्रशासनाच्या मदतीने सदर पंचशील ध्वज काढून घेण्यात आला त्याचप्रमाणे समस्त बौद्ध मंडळींना दमदाटी करण्यात आली त्यामुळे संतप्त बौद्ध समाजातील गावकरी तरुण महिला व लहान मुले हे अकोल्यात दाखल झाले होते.

वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र भाऊ पातोडे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष पी जे वानखडे सर, जिल्हा परिषद सदस्य राम गव्हाणकर यांना सकाळी ९ वाजता अशोक वाटिका येथे येऊन भेटले त्यांच्या समक्ष सर्व परिस्थिती गावकऱ्यांनी सांगितली त्यांच्याकडे असलेला नकाशा त्यांनी दाखविला राजेंद्र भाऊ पातोडे यांनी सदर प्रकरणांमध्ये वाद होऊ नये त्याचप्रमाणे दोन समाजांमध्ये धार्मिक तेढ निर्माण होऊ नये म्हणून अकोला जिल्हा प्रशासनासोबत संपर्क करून जिल्हाधिकारी कार्यालय येथील नियोजन भवन येथे गावकरी आणि जिल्हा प्रशासनासोबत समन्वय बैठक घेतली त्यामध्ये गावकऱ्यांच्या वतीने त्यांची समस्या जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचवण्यात आली आणि माननीय जिल्हाधिकारी महोदया आणि पोलीस अधीक्षक साहेब यांच्या माध्यमातून जातीय सलोखा कायम राहील आणि कोणत्याही प्रकारची धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याच्यासाठी दक्षता घेण्याचे आदेश पोलीस प्रशासन आणि गावातील जनतेस केले ह्यावेळी राजेंद्रभाऊ पातोडे यांनी गावकऱ्यांच्या वतीने सर्व हकीकत प्रशासनासमोर मांडली त्यावेळी
वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, जि प समाज कल्याण सभापती आम्रपालीताई खंडारे, संजय नाईक, मंगेश गवई, गुलाब उमाळे, सचिन शिराळे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, महासचिव राजकुमार दामोदर, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख ॲड. प्रशिक मोरे, जिल्हा उपाध्यक्ष आकाश दे. शिरसाट, नाजुकराव इंगळे, माजी सरपंच रेखाताई इंगळे, उपसरपंच उमाताई इंगळे, देवानंद इंगळे, प्रदिप इंगळे, निलेश इंगळे ,ॲड. सुबोध डोंगरे, आनंद खंडारे, जिल्हा सचिव श्रीकृष्ण देवकुणबी, सुजित तेलगोटे,
उमा प्रल्हाद इंगळे,इंदूबाई गणपत इंगळे,राजकन्या देवानंद तेलगोटे,रामा प्रकाश इंगळे,निळू विशाल इंगळे,प्रभा वासुदेव इंगळे,गौकर्णा सुखदेव इंगळे,माया जगजीवन इंगळे,अंकिता चंद्रशेखर इंगले,माला प्रीतम घ्यारे,कुसुमबाई माणिकराव इंगळे,महिमा प्रदीप इंगळे,संगीता अनिल इंगळे,माया शैलेश इंगळे,मीरा रविकिरण इंगळे,शालू नाजूकराव इंगळे,पुष्पा महादेव इंगळे,कल्पना गनेश इंगळे,सरला दिनेश इंगळे,सुनीता आनंद इंगळे,शीला रमेश इंगळे,अरुणा विनोद इंगळे,लक्ष्मी समाधान इंगळे,अन्नपूर्णा शिराम इंगळे,प्रमिला शिवराम इंगळे,रुपाली जनार्धन इंगळे,मकर्णा देवराव इंगळे,संगीता संतोष इंगळे,लता अरुण आंबोरे,वच्छला कैलास सुरवाडे,सीमा सुनील सुरवाडे,मीना विलास सुरवाडे,शीला मुरलीधर निखाडे,मंजू साहेबराव इंगळे,कल्पना दिलीप तायडे,अर्चना सिध्दार्थ इंगळे,अन्नपूर्णा शेषराव इंगळे,रत्नबाई भीमराव इंगळे,शीतल राजेश इंगळे,अर्चना मदन सोनोने
मंगला अरुण सदार, तसेच असंख्य गावकरी व कार्यकर्ते हजर होते.

Previous articleकृषि उत्पन्न बाजार समिती नफ्यात आणणाऱ्या सहकार पॅनल च्या पाठीशी उभे रहा! श्रीकृष्ण मोरखडे! वाडेगाव
Next article@ निधन वार्ता @