Home Breaking News मागासवर्गीय वस्त्यांमधील अपूर्ण विकासकामे सात दिवसांत पूर्ण करा; जिल्हा परिषद समाजकल्याण समितीच्या...

मागासवर्गीय वस्त्यांमधील अपूर्ण विकासकामे सात दिवसांत पूर्ण करा; जिल्हा परिषद समाजकल्याण समितीच्या सभेत निर्देश

योगेश घायवट  तालुका प्रतिनिधी  बाळापुर
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या (मागासवर्गीय ) वस्त्यांचा विकास योजनेंतर्गत जिल्हयातील मागासवर्गीय वस्त्यांमधील अपूर्ण विकासकामे येत्या सात दिवसांत पूर्ण करुन, प्रस्तावित नवीन विकासकामांचे नियोजन करण्याचे निर्देश जिल्हा परिषद समाजकल्याण समितीच्या सभेत गुरुवारी देण्यात आले. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे योजनेंतर्गत जिल्हयात सुरु असलेली आणि अपूर्ण असलेल्या विकासकामांचा तालुकानिहाय आढावा या सभेत घेण्यात आला.

मागासवर्गीय वस्त्यांमधील सुरु असलेली आणि अपूर्ण असलेली विकासकामे सात दिवसांच्या कालावधीत पूर्ण करुन, नवीन कामांचे नियोजन करण्याच्या सूचना या सभेत देण्यात आल्या. जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध याेजनांच्या मुद्दयांवरही सभेत चर्चा करण्यात आली. समाजकल्याण सभापती आम्रपाली खंडारे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या सभेला समितीचे सदस्य तथा सत्तापक्षाचे गटनेता ज्ञानेश्वर सुलताने, राम गव्हाणकर, निता गवइ, माया कावरे, वंदना झळके, लीना शेगोकार, सुनील सरदार यांच्यासह समाजकल्याण अधिकारी ज्ञानबा पुंड व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Previous articleशितल शेगोकार शेगाव यांना शांतिदूत पुरस्कार दिल्या जाणार!
Next articleहंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी खड्डा खोदून काढतात पाणी, पाणी टंचाईमुळे या गावातील मुलांची लग्नं रखडली