Home Breaking News शितल शेगोकार शेगाव यांना शांतिदूत पुरस्कार दिल्या जाणार!

शितल शेगोकार शेगाव यांना शांतिदूत पुरस्कार दिल्या जाणार!

शेगाव प्रतिनिधी

काव्य प्रांतात आपल्या नावाचा ठसा निर्माण केलेल्या बहुचर्चित काव्यसंग्रहासाठी साहित्य धारा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था औरंगाबाद यांच्या वतीने शांतिदूत पुरस्कार जाहीर करण्यात आला असून हा पुरस्कार 29 एप्रिल 2023 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र संभाजीनगर येथे सकाळी 11 वाजता सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक डॉक्टर संघर्ष सावळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविले आहे
प्रबुद्ध हो मानवा संघर्षातून उत्कर्षाकडे या बुद्ध विचारांना अनुसरून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थेच्या माध्यमातून 25 85 वा बुद्ध जयंती उत्सव अनेक विविध प्रकारे कार्यक्रमाद्वारे संपन्न होत आहे राज्यस्तरीय शांती दूत पुरस्काराने शितल शेगोकार यांचा सत्कार होत असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे

Previous articleजिल्हा सामान्य रुग्णालयातील केस पेपरवरील जातीचा उल्लेख रद्द करा
Next articleमागासवर्गीय वस्त्यांमधील अपूर्ण विकासकामे सात दिवसांत पूर्ण करा; जिल्हा परिषद समाजकल्याण समितीच्या सभेत निर्देश