अकोला – वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते निलेश देव यांनी आज शहरातील डॉ. हेडगेवार रक्तपेढी जवळ आंदोलन करत महापालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाला चांगलेच धारेवर धरले. जठार पेठ व इतर भागातील सर्विस लाइन यांचे काँक्रिटीकरण होते मात्र, रस्त्याकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप त्यांनी केला.
वंचितचे युवा नेते निलेश देव यांच्या आंदोलनानंतर बिर्ला राम मंदिर रेल्वे गेट ते न्यू तापडिया नगर, दिवेकर चौक ते ब्राह्मण सभा शाळेसमोरील रस्ता, त्याचबरोबर डॉ. हेडगेवार रक्तपेढी रोड उमरी, सिद्धिविनायक मंदिर रोड जठारपेठ, त्याचबरोबर केला प्लॉट येथील इंद्रायणी मतिमंद मुलांच्या शाळेकडे जाणारा रस्ता या सर्व रस्त्यांची कामे निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर त्वरित सुरू करण्यात येतील. असे लेखी आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आज दिले. आज सकाळपासून निलेश देव व स्थानिक नागरिकांनी डॉ. हेडगेवार रक्तपेढी जवळ भर उन्हात रस्त्यावर बसून आंदोलन केले. या आंदोलनाची गंभीर दखल महापालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली. त्याविषयीचे लेखी पत्रच पूर्व झोनचे क्षेत्रीय अधिकारी विजय पारतवार यांनी लिहून दिले. यावेळी रामदास पेठ पोलीस व स्थानिक नागरिकांची उपस्थिती होती. लेखी पत्रानंतर क्षेत्रीय अधिकारी विजय परतवार यांनी ज्यूस पाजून निलेश देव यांचे आंदोलन थांबवले. यावेळी मोठ्या संख्येत वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व नेते उपस्थित होते. त्याचबरोबर जठारपेठ येथील नागरिकांची देखील मोठी उपस्थिती होती.
सर्व सामान्य जनतेच्या मुलभूत सुविधा पुरविण्यात अपयशी ठरलेल्या अकोला महानगर पालिकेच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी अकोला महानगर युवा नेते निलेश देव यांच्या नेतृत्वात डॉ. हेडगेवार रक्तकेंद्र जठारपेठ येथील रहिवासी असलेल्या रस्त्याच्या खड्ड्यात बसुन आंदोलन केले. त्यांच्या सोबत महिला महानगर अध्यक्ष वंदनाताई वासनिक, माजी महानगर अध्यक्ष बुद्धरत्न इंगोले, युवक जिल्हा अध्यक्ष श्रीकांत घोगरे, युवक महासचिव राजकुमार दामोदर, युवक महानगर अध्यक्ष पाश्चिम आशिष मांगुळकर, पुर्व अध्यक्ष जय तायडे, युवक महासचिव कुणाल राऊत, सौ.कल्पनाताई महल्ले, महानगर उपाध्यक्ष राजेश मोरे, जिल्हा उपाध्यक्ष आनंद खंडारे, संघटक रितेश यादव, आकाश जंजाळ, राजेश बोबडे, सत्यप्रकाश आर्या, कैलाश तिरपुडे, आशिष सोनोने, प्रशिक तिरपुडे, अभिषेक मेश्राम, शेगावकर गुरुजी, बंटी तायडे, विनित तिरपुडे, चिकू सुर्यवंशी सह कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.