Home Breaking News तपोवनातील गोदापात्राला पाणवेलींचा वेढा

तपोवनातील गोदापात्राला पाणवेलींचा वेढा

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़

गोदावरी पात्रातील पाणवेली काढन्याचे काम नाशिक महापालिकेने हाती घेतले होते, ते पुर्ण झाले नसून, त्यामुळे प्रवाहाबरोबर मोठ्या प्रमाणावर वाहत आलेल्या पानवेलींमुळे गोदापात्र भरल्याचे दृश्य नाशिक मध्ये पहावयास मिळत आहे. घा घारपुरे घाट, रामवाड़ी, सोमेस्वर, आनंदवल्ली, या भागात महापालीकेने विशेष यंत्रा मार्फ़त पानवेली काढ़ण्यासाठी विशेष मोहीम राबवली होती. मात्र तरीही त्या रामकुंड,गाड़गे महाराज पुला खाली वाहुन आल्या चेही दिसुन येत आहे. महापलिकेच्या तोकड़ी कर्मचारी संख्ये मुळे व कामा च्या मंद गतीमुळे महापालीकेला त्या पुर्णपणे काढ़णे शक्य झाले नसल्या मुळे गोदामाईच्या नदीपात्रा वर पूर्णता हिरव्या रंगाची चादर पसरून आल्याचे व त्याखाली नदीपात्र पुर्ण झाकले गेल्याचे दिसत आहे.
” गोदामाई प्रतिष्ठान ” ही पर्यावरण प्रेमीची संस्था गेल्या 48 आठवड्या पासुन गाडगे महाराज धर्मशाळा व त्या आसपास च्या परिसरात ” स्वच्छता अभियान ” राबवित आहे. प्रतिष्ठानचे गोदासेवक दर रविवारी या ठिकाणी स्वयं प्रेरणेने दोन तास नदी स्वच्छता करण्याचे व पर्यावरण रक्षणाचे काम सातत्याने करत असतात. गोदामाई प्रतिष्ठान ने सुद्धा आपल्या स्वच्छता अभियाना मध्ये गोदापात्रातील मोठ्या प्रमाणात साचलेल्या पाण वेली काढ़ण्याच्या कामाला प्राधान्य देवून त्या काढ़ण्यात येत आहे. गोदामाई प्रतिष्ठान चा आदर्श इतर पर्यावरण संवर्धन करणा-या संस्थानी घेवून पाणवेली काढ़ण्याचे कामी पुढाकार घेतल्यास या पर्यावरण जतण करण्याच्या मोठ्या कार्यास हातभार लागेल.

Previous articleवडिलांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या लोकांवर कारवाईची मागणी
Next article