Home Breaking News वडिलांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या लोकांवर कारवाईची मागणी

वडिलांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या लोकांवर कारवाईची मागणी

मुलगा सुशील जंजाळ यांची मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार

शेख चाँद अकोला जिल्हा प्रतिनिधी

वाडेगाव:- बाळापुर तालुक्यातील वाडेगाव येथील बाबुराव जंजाळ यांचा मनपा आयुक्त यांच्या बंगल्यावर आगे मोहळ काढता असताना झाडावरून पडल्याने मृत्यूस कारणीभूत असलेल्या लोकांवर कायदेशीर कारवाई होण्यासाठी मृतकाचा मुलगा सुशील जंजाळ यांनी रामदास पेठ पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे .याची दखल न घेतल्याने मुख्यमंत्री यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे.
दिलेल्या तक्रारीनुसार काही लोकानी१४ मार्च रोजी माझ्या वडिलांना माझ्या घरून पैसे चे आमिष देऊन अकोला महानगरपालिका आयुक्त यांच्या बंगल्यावर काहीतरी काम करण्यास करण्यासाठी घेऊन गेले असता जास्त पैसे देऊन त्यांना आगे मोहळ काढून देण्यासाठी झाडावरून चढविले मात्रा त्या संबधित लोकांनी जे काम करायला लावले त्यासाठी कुठलीही सुनियोजित तयारी न करता त्यामुळे त्यांच्याकडून कोणतीही उपाय योजना न करता किंवा अशी कुठलीही तरतूद न करता गैर अर्जदार लोकच माझ्या वडिलांच्या मृत्यूस कारणीभूत आहेत .त्यांच्या या बेजाबाबदारपणामुळे माझ्या वडिलांचा जीव गेला आहे. माझ्या वडिलांना आगे मोहोळ काढण्यासाठी सांगितले जी काही संरक्षण साहित्य असते संरक्षण जाळी वगैरे असते तर वाचायला पाहिजे होते .त्यामुळे माझ्या वडिलांचा जीव वाचला असता .त्या लोकांनी माझ्या वडिलांना हे काम करायला लावताना कुठलीही काळजी घेतली नाही. अगदी बेजबाबदार पणे पूर्ण विषारी आगे मोहोळ काढण्यास भाग पाडले .त्यामुळे निष्काळजी पणे वागणाऱ्या कर्मचाऱ्यांचा व संबधित व्यक्तीच्या दुर्लक्षमुळे माझ्या वडिलांचा त्या लोकांनी सदोष मनुष्य वध घडवून आणला आहे. माझ्या वडिलांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या लोकांवर कडक कारवाई करण्यात यावी. व मला न्याय देण्यात यावा अशी मागणी वाडेगाव येथील मृतकाचा मुलगा सुशील बाबुराव जंजाळ यांची रामदास पेठ पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली आहे . व मुख्यमंत्री यांच्याकडे सुद्धा तक्रार दिली आहे.वडिलांना न्याय मिळावा यासाठी मुलगा सुशील जंजाळ वन वन प्रशासन कार्यालयात चकरा मारत आहे..

Previous articleबीडच्या मराठवाडा विभागीय “व्हाईस ऑफ मिडीया” अधिवेशनात पत्रकारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : संदीप काळे
Next articleतपोवनातील गोदापात्राला पाणवेलींचा वेढा