Home Breaking News बीडच्या मराठवाडा विभागीय “व्हाईस ऑफ मिडीया” अधिवेशनात पत्रकारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे...

बीडच्या मराठवाडा विभागीय “व्हाईस ऑफ मिडीया” अधिवेशनात पत्रकारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : संदीप काळे

आनंद ढोणे पाटील
परभणी: येथे व्हॉईस ऑफ मिडीयाची तारीख १५ एप्रिल २०२३ रोजी जिल्हास्तरीय बैठक संपन्न झाली.
व्हॉईस ऑफ मिडीयाचे बीड येथे मराठवाडा विभागीय अधिवेशन दि.३० एप्रिल २०२३ रोजी आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात पत्रकारांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या अधिवेशनास व्हॉईस ऑफ मिडीयाच्या पदाधिका-यांसह परभणी जिल्ह्याच्या सर्व तालुक्यातील व्हाईस ऑफ मिडीयाच्या सदस्य व पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन व्हॉईस ऑफ मिडीयाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी नागपूर येथून ऑनलाईन केले आहे.त्यासहच व्हाईस मिडीयाच्या दिव्या पाटील यांनी देखील मार्गदर्शन केले.
व्हॉईस ऑफ मिडीयाची जिल्हास्तरीय बैठक शनिवार, दि.१५ एप्रिल रोजी व्यंकटेश मंगल कार्यालय, एमआयडीसी, परभणी येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्य सहसरचिटणीस डॉ ज्ञानेश्वर भाले होते.तर यावेळी संघटनेचे राज्य कार्यवाहक सुरज कदम, मराठवाडा अध्यक्ष विजय चोरडीया, जिल्हाध्यक्ष गजाननजी देशमुख, सरचिटणीस श्रीकांत देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष प्रविण चौधरी, शहराध्यक्ष अक्षय मुंडे, साप्ताहीक विंगचे प्रदेश उपाध्यक्ष नेमीनाथ जैन, साप्ताहीक विंगचे जिल्हाध्यक्ष विवेक मुंदडा आदींची उपस्थिती होती. या बैठकीला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, कार्यालयीन सेक्रेटरी दिव्या भोसले, बीड जिल्हाध्यक्ष बालाजी मारगुडे आदिंची ऑनलाईन उपस्थिती होती.
यावेळी उपस्थीतांना संदीप काळे म्हणाले की, व्हॉईस ऑफ मिडीया ही देशपातळीवर काम करणारी संघटना पत्रकार आणि पत्रकारितेसाठी कृतिशील कार्यक्रम राबवणारी संघटना आहे. पत्रकांराना पेंशन, स्वत:ची घरे, पत्रकारांच्या मुलांचे शिक्षण आदी प्रमुख प्रश्न सोडवण्यासाठी संघटनेकडून विविध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. बीड येथील अधिवेशनात पत्रकारांच्या महत्वाच्या प्रश्नावर चर्चा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी दिव्या भोसले, बालाजी मारगुडे, ज्ञानेश्वर भाले, विजय चोरडीरया, सुरज कदम, गजानन देशमुख यांनी देखील मार्गदर्शन केले. संघटनेत नव्याने नियुक्त झालेले मराठवाडा उपाध्यक्ष विशाल माने, जिल्हा कार्याध्यक्ष कैलास चव्हाण यांच्यासह सर्व मान्यवर व पूर्णा,परभणी, पालम,जिंतूर,गंगाखेड,मानवत,सेलू,सोनपेठ,पाथरी तालुक्यातील पदाधिका-यांचे पुष्पहार घालून संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी संघटना वाढीसाठी केलेल्या कार्याबद्दल सर्व तालुकाध्यक्षांचा देखील सत्कार करण्यात आला.
बैठकीच्या यशस्वितेसाठी शिवाजी वाघमारे, बाळासाहेब काळे, अमोल लंगर, गणेश लोखंडे, सुधीर बोर्डे, मंदार कुलकर्णी, शेख मुबारक, विष्णू सायगुंडे आदींनी परिश्रम घेतले.

Previous articleकल्याणकारी मजुर असोसिएशनच्या कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
Next articleवडिलांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या लोकांवर कारवाईची मागणी