शेख चाँद जिल्हा प्रतिनिधी :-पारस तालुका बाळापूर येथे बाबूजी महाराज मंदिर दर रविवार प्रमाणे दरबार भरत असून वारीसाठी संपूर्ण ग्रामीण परिसरातील अनेक लोक हजर असतात संध्याकाळी आठ वाजताची वेळ आणि आरती संपताच अर्धा तासापासून जोरात सुरू असणाऱ्या वारा वादळाने आणखी गंभीर आणि भयानक स्वरूप घेतले मंदिर गाभारा व मंदिराचा हॉल व त्या समोरील मोठे टीन-शेड मध्ये सर्वांनी पाण्यापासून घेतला असताना भरपूर वारा वादळावर वीज चमकत असताना शंभर वर्ष पेक्षा जास्त जुनं झाड मोठ झाड अचानकपणे शेडवर कोसळले आणि वीजही गेली वरून भरपूर पाऊस सुरू आणि शेड खाली कित्येक महिला मुले लहान मुले दबलेली अशी भयानक स्थिती निर्माण झाली यावेळेस प्रशासन आणि सर्व गावकरी मंडळी सर्व समाजातील गावकरी मंडळी एकत्रितपणे धावून आली प्रकाश तायडे बंडूभाऊ इंगळे संजय बरताससे महेश तायडे मयूर इंगळे मयूर तायडे सूरज तायडे राहूल राऊत योगेश रावंडले विकी रावांडले प्रणव बोचरे गणेश कवर सह अनेक तरुणांची पथक त्या ठिकाणी उपस्थित झाली प्रशासनांनी संपूर्ण मदत तिथे पोहोचवली व तेथील सर्वांनी नागरिकांना वाचवण्यास प्रयत्न सुरू केले साधारणता एक तासात जवळपास ते झाड बाहेर काढण्यात आले नागरिकांना बाहेर काढण्यात आले पण झाडाच्या बुंध्याशी त्यावेळी थांबलेले असणारे नागरिक चां मृत्यू झाला आतापर्यंतचा सात जणांचा मृत्यू त्यामध्ये झाला असून अनेक बावीस ते पंचवीस लोक अजूनही मेडिकल कॉलेज अकोला येथे उपचार घेत आहेत यांनी मृतकांच्या परिवाराला एक कोटी रुपयांची आर्थिक मदत सरकारने द्यावी अशी मागणी प्रकाश तायडे सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस यांनी केली असून गेल्या दोनदा पातुर आणि बाळापूर तालुक्यात झालेल्या गारपीट जबरदस्त शेतकऱ्यांच्या नुकसानाला सामोरे जावे लागले तेरी अजूनही सरकारने प्रतिसाद दिला नसून कुठली मदत घोषित केली नाही तरी तीही त्वरित मदत घोषित करावी अशी मागणी प्रकाश तायडे सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस यांनी केली असून त्यांच्यासोबत साजिद खान पठाण काँग्रेस नेते जिल्हा परिषदचे समाज कल्याण सभापती आम्रपाली अविनाश खंडारे हे सुद्धा मेडिकल कॉलेजमध्ये रुग्णांची विचारपूस करीत काळजी घेत उपस्थित होते