Home Breaking News हिरण्यगर्भ सिरंजनी केसरी कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन्न..

हिरण्यगर्भ सिरंजनी केसरी कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन्न..

हिरण्यगर्भ बहुद्देशीय प्रतिष्ठाण, सिरंजणीच्या सौजन्याने पै. कै. किशन नागोबा वासुदेव यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेली हिरण्यगर्भ सिरंजणी केसरी कुस्ती स्पर्धा उत्साहात पार पडली

अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनिधी
हिमायतनगर

(वाढोणा)तालुक्यातील सिरंजनी गावाततील कुस्ती स्पर्धेसाठी नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून पैलवानांनी हजेरी लावली होती. स्पर्धेत अनेक चुरशीच्या लढती झाल्या.
शेवटची मानाची कुस्ती पै.राजु कदम रा.निळा जि. नांदेड येथील व पै. योगेश पाटील नाशिक यांच्यात अतिशय तुल्यबळ व अटीतटीची लढत झाली. यात राजू पैलवान यांनी बाजी मारली व हिरण्यगर्भ सिरंजणी केसरी चा मान मिळवला. प्रसंगी गावातील कुस्ती क्षेत्रातील नामवंत पैलवान  रामा काशीबा सुर्यवंशी,  जयवंतराव दावजी देशमाने,  बब्रुवाहन भुमाजी गडमवार व सामाजिक क्षेत्रातून सेवानिवृत्त वन अधिकारी  भीमराव गेंदाजी कावळे, . संभाजी लक्ष्मण सुरोशे यांना हिरण्यगर्भ जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पुरस्कार प्राप्त व्यक्तींच्या जीवनावर  भाटे सर यांनी अतिशय सुरेख भाषेत प्रकाश टाकला या कुस्ती स्पर्धेच्या
कार्यक्रमाला हिमायतनगर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक बी. डी. भुसनर साहेब यांनी आपल्या पोलीस सहकार्यासह उपस्थिती लावून चोख बंदोबस्त दिला. त्याच बरोबर गोल्ला गोलेवार समाजाचे प्रांन्त अध्यक्ष  भुमन्ना अकेमवाड, जि अध्यक्ष रमेशजी बद्दीवार, प्रकाश करेवाड, संतोष अकेमवाड, बकन्ना कोमलवाड व तसेच पमेश्वर गोपतवाड देवसरकर गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती होती.


कार्यक्रमाचे धावते समलोचन  अंगुलवार सर,  भाटे सर व  लक्ष्मण लिंगमपल्ली यांनी केले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मित्र परिवाराने अथक परिश्रम घेतले त्याबद्दल हिरण्यगर्भ चे सचिव  पवन करेवाड यांनी सर्वांचे आभार मानले.

Previous articleहेमंत शिंदे यांचे गोदाप्रतिष्ठान च्या वतीने वाढदिवसा निमित्त अभिष्टचिंतन
Next articleनांदेड जिल्ह्यात शेतपांदण रस्ते मोकळे करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी.