Home Breaking News परीक्षा परिषदेच्या ‘टैट ‘चे गुण पत्रक उपलब्ध ; 20 एप्रिल पर्यंत मुदत

परीक्षा परिषदेच्या ‘टैट ‘चे गुण पत्रक उपलब्ध ; 20 एप्रिल पर्यंत मुदत

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़
मो नंबर -8983319070

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे तर्फे घेतलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी 2022 या टैट परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परिक्षेच्या निकालाचे गुणपत्रक उमेदवारांना ऑनलाइन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. उमेदवारांनी परिक्षेच्या निकालाचे गुणपत्रक 20एप्रिल च्या आत डाउनलोड करुन घ्यावे, असे आवाहन परीक्षा परिषदेने केले आहे.
परीक्षा परिषदेने टैट 2022 या परिक्षेचा निकाल जाहीर करताना उमेदवारांना गुणपत्रक उपलब्ध करुन दिले नव्हते. दरम्यान, टैट च्या निकालात टीईटी गैरव्यवहरात प्रतिबंधित केलेल्या उमेदवारांची नावे असून टीईटी परिक्षे प्रमाणेच याही परिक्षे त गैरव्यवहार झाल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.
दरम्यान, परीक्षा परिषदेने या परिक्षेचे गुणपत्रक उपलब्ध करुन न दिल्याने यात गैरव्यवहाराची शक्यता दृढ होत आहे. त्यामुळे परिक्षा परिषदेने गुणपत्रक उपलब्ध करुन दयावे, अशी मागणी उमेदवारांनी केली होती. दरम्यान, गुणपत्रक डाउनलोड करुन त्याची एक प्रतप्रक्रिया पुर्ण होईपर्यंत जपून ठेवावी, असे परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे.

Previous article30 एप्रिल रोजी राष्ट्रीय लोक अदालत चे आयोजन
Next articleक्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा