मुख्याध्यापक संघाच्या पाठपुराव्यास यश
हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़ मो. नंबर – 8983319070
शिक्षकांची वैधकीय देयके व रजा रोखीकरण बिले 100 टक्के मंजूर करण्यात आली आहे. दोन दिवसात ही देयके शिक्षकांच्या बैंक खात्यात जमा होतील. जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या पाठपूराव्यास यश आले असून तीन वर्षापासुन प्रश्न सुटल्याने शिक्षकांकडून त्याचे स्वागत केले जात आहे.
वेतनपथक अधीक्षक उदय देवरे यांच्यासोबत मुख्याध्यापक संघाने आढ़ावा बैठक घेतली. यावेळी संघाचे अध्यक्ष एस. के सावंत, सचिव एस. बी. देशमुख, उपाध्यक्ष प्रदीप सांगळे, परवेज शेख, के. डी. देवढे, डी. एस. ठाकरे, बाळासाहेब मोरे, प्रकाश पानपाटील, विनायक पाटील उपस्थित होते. निधीअभावी ही देयके अजून मिळालेली नव्हती. यातील तीन कोटीची रजा रोखीकरण देयके मंजूर झाली असून अजून 97 कोटी रुपयांची कमतरता आहे.