रामनवमी निमित्त गोदाकाठी अहिल्याराम मंदिरात आरती व राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळा 31 मे जयंती नियोजन बैठक.
हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नंबर – 8983319070
पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी नाशिकच्या गोदावरी घाटावर बांधलेल्या श्रीराम मंदिरात समाज जागृती व्हावी,आपला ईतिहास, आपली श्रद्धा स्थानांची नविन पिढीला माहिती व्हावी या उद्देशाने दि.30 मार्च 2023 रोजी दुपारी 12वा. अहिल्याप्रेमी समाजबांधवा कडून प्रभू श्रीरामांच्या आरती करण्यात आली तसेच विविध सांस्कृतिक मंडळ, भजनी मंडळ यांचे सुमधुर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच अहिल्या राम मंदिर यांचे विश्वस्त पुजारी वैभव क्षमकल्याणी यांचा हे मंदिराची जपवणूक करून मंदिराची देखभाल करतात त्या कारणास्तव त्यांचा स्मृतिचिन्ह देऊन व शाल देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवींची, प्रभू रामचंद्राची आरती करण्यात आली. सोबतच 31 मे रोजी संध्याकाळी 5वाजता अहिल्याराम पटांगण गोदा घाट या ठिकाणी जन्मोत्सव साजरा करण्याचे नियोजन केले आहे त्या अनुषंगाने नियोजन बैठक घेण्यात आली.
तरी सर्व समाज बांधव व सर्व जाती धर्मातील बांधवांनी या जन्मोत्सव सोहळ्यास उपस्थित राहून आपले 31 मे हा दिवस राखून सर्वांनी राखून ठेवावा,
यामध्ये नियोजन बैठकीमध्ये प्रहार चे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख दत्तू भाऊ बोडके धनगर धर्म पिठाचे कार्यधक्ष विनायक काळदाते, प्रहार जिल्हा चिटणीस समाधान बागल ,होळकर शाहीचे राजोळे घराण्याची वंशज भाऊसाहेब राजोळे, मल्हार महासंघाचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब सपनार, अमोल गजभार, राजाभाऊ बदड, ऋषिकेश ढापसे, देवराम रोकडे भूषण जाधव,नितीन साळुंखे वैभव रोकडे श्याम गोसावी,सत्यम बागल उपस्थित होते. या बैठकीत श्री. ऋषिकेश ढापसे यांची जन्मोत्सव समिती अध्यक्ष पदी सर्वानुमते निवड करण्यात आली.