👉 ह.भ.प. ज्ञानेशजी महाराज शिवणीकर यांचे प्रतिपादन
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- २८ मार्च २०२३
भारत देश हा लोकसंख्येच्या बाबतीत जगाच्या पाठीवर नंबर दोन नंबर चा देश आहे. या आधुनिक काळात माणसाची वैचारीक सुध्दता होणे अंत्यंत गरजेचे आहे.
वैचारीक मार्गदर्शनचा अभाव आज समाजात दिसत आहे. हे वैचारिक मार्गदर्शन मिळते फक्त अखंड हरिनाम सप्ताहात आहे.
विचाराचे स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला आहे. परंतु आपले विचार बदलण्याची गरज आहे.
वैचारीक परीवर्तन, सामाजिक परीवर्तन, म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह होय.
माणसाचे मन परीवर्तन होणेही
आवश्यक आहे. गावातील दारू बंद व्हावी. हि काळाची गरज आहे. दारू बंद झाली तर गावातील कुटुंबांचे अनेक फायदे होतात.
व्यासनाधिनता कमी झाली पाहिजे.महिलांनी ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. टिवी आणि सिरीयल मधुन महिलांनी बाहेर पडले पाहिजे. असेही ते म्हणाले.
संत हे धर्म रक्षणासाठी आलेले आहेत. संतांच्या सानिध्यात त्यांच्या विचार अंगिकारुन आपले जिवण परीवर्तन करणे गरजेचे आहे. माणुस कशासाठी जन्माला आला? कधी स्वःताला तुम्ही विचार केला आहे का? मनुष्य जन्म मिळणे हे आपले भाग्य आहे. त्यासाठी आपण काय खावे, काय प्यावे, कसे राहावे. याचे ज्ञान या अखंड हरिनाम सप्ताहात मिळते.
धर्माचे पालन करणे हे संताचे कार्य आहे. म्हणुन संतांनी जे सांगितले ते ते अंगिकारावे.
तरुणांनी आईवडीलांची सेवा करावी. तरुणांनी व्यसनाच्या आहारी न जाता धर्म रक्षणासाठी कार्य केले पाहिजे. असेही ते म्हणाले. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पवनपुत्र हनुमंत रायाच्या दरबारात अखंड हरिनाम सप्ताह अतिशय उत्साहाने साजरा होत आहे. गावातील भाविक भक्त अतिशय आनंदाने या अखंड हरिनाम सप्ताहाचा आनंद घेत आहेत.