Home Breaking News नुकसानीची पाहणी……थेट शेतकऱ्यांच्या बांधावरुन….

नुकसानीची पाहणी……थेट शेतकऱ्यांच्या बांधावरुन….

👉 आ. माधवराव पाटील जवळगावकर पुन्हा शेतकऱ्यांसाठी सरसावले!

जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 20 मार्च 2023

नांदेड जिल्ह्यातील विविध तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच हिमायतनगर तालुक्यात गहु, हरभरा, हळद, कलींगड, ज्वारी आदी पिकांचे नुकसान झाले असून, हि बातमी कळताच हदगाव -हिमायतनगर तालुक्याचे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. आणी शेतकऱ्यांना शाससाने त्वरीत मदत द्यावी. अशी मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारा लोकप्रिय नेता म्हणून पुन्हा एकदा आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी सिध्द केले आहे. बळिराजाला मदत मिळेपर्यंत आपण स्वस्त बसणार नाही. असेही ते यावेळी म्हणाले. त्यांनी राज्यांचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना निवेदन देऊन मागणी केली आहे. वेळोवेळी शेतकऱ्यांच्या हितासाठी झटणारा आपला नेता म्हणून आमदार माधवराव पाटील जवळगावकर साहेब यांची मतदार संघात ओळख आहे.

Previous articleश्रीमंत सुभेदार मल्हारराव होळ कर यांचा जन्मोत्सव सोहळा नाशिक मध्ये उत्साहात संपन्न
Next articleपातुर शहरात पाण्याचा पुरवठा हा दैनंदिन करावा जीवन प्राधिकरण शाखा अभियंता यांना ग्रामस्थांचे निवेदन