Home Breaking News श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळ कर यांचा जन्मोत्सव सोहळा नाशिक मध्ये उत्साहात संपन्न

श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळ कर यांचा जन्मोत्सव सोहळा नाशिक मध्ये उत्साहात संपन्न

प्राध्यापक यशपाल भिंगे सर यांचा नागरी सत्कार मोठ्या उत्साहात साजरा

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समिती आयोजित केलेल्या सुभेदार मल्हारराव होळकर जन्मोत्सव मोठ्या उत्साहात नाशिकच्या तुळजाभवानी मैदानावर येळकोट येळकोट जय मल्हारचा निनाद घुमला. या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक यशपाल भिंगे सर, शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे, ओबीसी तथा जेष्ठ धनगर समाज नेते मा. आ. प्रकाश आण्णा शेंडगे यांच्यासह प्रहारचे जिल्हा चिटणीस श्री. समाधान भाऊ बागल, खंडेराव पाटील, शिवाजी दादा ढेपले, दत्तू भाऊ बोडके, विनायक काळदाते, शरद भाऊ शिंदे, भास्कार जाधव, देविदास भडांगे, संदिप तांबे, नंदाळे सर, भिवानंद काळे, बापूसाहेब शिंदे, अरुण शिरोळे, शिवाजी ढगे, राजाभाऊ पोथारे, भाऊलाल तांबडे, लक्ष्मण बर्गे तसेच हजारो होळकर प्रेमी उपस्थित होते. इतिहासाची आठवण देणारा हा सोहळा लक्षवेधी ठरला. अध्यक्षा सौ. सोनालीताई पोटे, उपाध्यक्ष श्री. अण्णासाहेब सापनर, स्वागत अध्यक्ष श्री. नवनाथ भाऊ शिंदे, श्री. राजाभाऊ बधाड, श्री. भाऊसाहेब राजोळे, श्री. देवराम रोकडे बाबुराव हिंगे, श्री. विजय चितळकर, श्री. शाम गोसावी, श्री. वैभव रोकडे हेमंत शिंदे, श्री. भूषण जाधव, सौ. शिल्पाताई झारेकर, सौ. पुनमताई शिरोळे, श्री. संदेश मोरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर एकपात्री नाटक सौ. स्वाती गजबार यांनी केले. तसेच कार्यक्रमाची प्रास्ताविका रामदास काळे यांनी केली. आपल्या अमोघ वाणी व अभ्यास पूर्ण विश्लेषण यामधून इतिहासाची पानं उलगडून भविष्याचा सामाजिक, राजकीय वेध घेणारे उच्चशिक्षित, प्रमुख वक्ते म्हणून प्रा. भिंगे सर नाशिक येथे उपस्थित होते. या वेळेस प्रा. भिंगे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीचा महाराष्ट्र व नंतरचा महाराष्ट्र आणि स्वराज्याच्या विस्तारात सुभेदार मल्हारराव होळकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व संपूर्ण होळकर घराण्याचे योगदान याबद्दल प्रेरणादायी माहिती आपल्या व्याख्यानातून श्रोत्यांसमोर मांडली. महाराष्ट्राच्या तरुणाईला प्रेरणा देणाऱ्या इतिहासाची उजळणी यावेळी झाली. मल्हाररावांनी छत्रपती शिवरायांचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी केलेल्या लढाया इतिहासाची सुवर्ण पानं बनली आहेत, असाच सूर कार्यक्रमातून निघाला. होळकर घराण्याची स्थापना करणारे मल्हारराव होळकर हे अटकेपार झेंडा रोवण्यापासून ते पानिपतच्या निर्णायक लढाई पर्यंत मराठा साम्राज्यासाठी लढत राहिले. इतिहासात त्यांचं नाव अजरामर झालंय. यावेळी श्री. आनंद ठाकूर यांनी भरवलेल्या होळकरशाहीचे शस्त्र प्रदर्शन सर्व प्रमुख पाहुण्यांनी बघितले. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समितीचे आयोजक दिगंबर भाऊ मोगरे, समाधान भाऊ बागल यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

आयोजक : दिगंबर भाऊ मोगरे
समाधान भाऊ बागल 

Previous articleसरसम जि. प. गटात एक शेतकरी पुत्र नव तरूणाची धडक ; दिनेश राठोड यांची या मतदारसंघात जोरदार तयारी.
Next articleनुकसानीची पाहणी……थेट शेतकऱ्यांच्या बांधावरुन….