Home Breaking News सरसम जि. प. गटात एक शेतकरी पुत्र नव तरूणाची धडक ; दिनेश...

सरसम जि. प. गटात एक शेतकरी पुत्र नव तरूणाची धडक ; दिनेश राठोड यांची या मतदारसंघात जोरदार तयारी.

हिमायतनगरप /प्रतिनीधी :- अंगद सुरोशे ( वार्ताहर )

सरसम जिल्हापरिषद गटात एका नव तरूण युवकाने प्रवेश केला आहे. या मतदारसंघात दिनेश राठोड यांनी मोठा जनसंपर्क वाढविला असून कोणत्याही स्थितित निवडणूक लढणार आणी जिंकून दाखविणार असल्याचे शेतकरी पुत्र नव तरूण असलेले दिनेश राठोड यांनी सांगीतले आहे.

जिल्हापरिषद परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका ह्या कोणत्याही क्षणी जाहीर होवू शकतात. तत्कालीन महाविकास आघाडी शासनाच्या काळात जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या निवडणूका घेण्यासाठी वातावरण निर्मिती झाली होती. नव्याने सिरंजनी जि. प. गट वाढवण्यात येवून आरक्षण ही जाहिर झाले होते. परंतू राज्यात अफलातून सत्ता परिवर्तन झाले. राज्यात घडलेल्या राजकीय महानाट्यातून नव्याने बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गट व भाजप युतीच्या माध्यमातून सरकार स्थापन झाले.,आणी महाविकास आघाडी सरकारचा तो निर्णय रद्दबातल करण्यात आला. आणी पुर्वी प्रमाणे तालूक्यात दोनच म्हणजेच कामारी, दुधड व सरसम, सिरंजनी हे गट कायम केले. खरंतर लोकसंख्येच्या प्रमाणात एक गट वाढलेला खऱ्या अर्थानं चांगला होता, लोकांनीही त्या निर्णयाचे चांगले, स्वागत व समर्थन केले होते. आताही या तालुक्यात एक जिल्हापरिषद गट वाढवावा. अशी मागणी जनतेची आहेच, सरसम जिल्हापरिषद गटात सरसमकर, दरेसरसमकर यांचीच चलती राहत आली आहे. परंतू आता या मतदारसंघात एका नव्या चेहर्‍याने एन्ट्री केली असून एका गरिब, होतकरू असलेल्या दिनेश राठोड यांनी या मतदारगटात आपला जनसंपर्क वाढविला आहे. जनता ही त्याच त्याच चेहर्‍याला कंटाळली असल्याचे बोलल्या जात आहे. दिनेश राठोड हे गोरगरीब लोकांच्या मदतीला धावून जात आहेत. व सर्व स्तरातील नागरीकांच्या सुख दुखात सामील होवून, जनतेची कामे करीत आहेत. त्यामुळे सध्यातरी या सरसम गटात दिनेश राठोड यांच्या नावाची जोरदार चर्चा होवू लागली आहे. जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा कालावधी संपुष्टात येवून जवळपास एक दिड वर्षाचा कालावधी संपुष्टात येत आहे. राज्यात युतीचे शासन सध्यातरी स्थिर आहे. त्यामुळे आगामी जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीचा कार्यक्रम केव्हाही घोषित होवू शकतो. नव्याने सरसम जिल्हापरिषद गट ओबीसी, किंवा सर्वसाधारण जरी आरक्षित झाल्यास आपण निवडणूक लढविणारच आहे. असे सांगतांना दिनेश राठोड म्हणाले की, हदगाव हिमायतनगर विधान सभेचे लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण शिवसेना, नाही, तरी पक्षविरहीत निवडणूकीला सामोरे जाण्यासाठी सज्ज असल्याचे दिनेश राठोड यांनी जाहीर केले आहे. आता एका नवख्या तरूणाला या जिल्हापरिषद गटातील जनता कसा प्रतिसाद देते हे पाहणे औत्सूकतेचे ठरणार आहे. एवढे मात्र निश्चित……..

Previous articleविदर्भस्तरीय बाँडी बिल्डर. स्पर्धा संपन्न
Next articleश्रीमंत सुभेदार मल्हारराव होळ कर यांचा जन्मोत्सव सोहळा नाशिक मध्ये उत्साहात संपन्न