Home Breaking News कारला येथे अखंड हरिनाम सप्ताह व संगीत भागवत कथेचे आयोजन-

कारला येथे अखंड हरिनाम सप्ताह व संगीत भागवत कथेचे आयोजन-

पू.बालयोगी गजेंद्र महाराज यांच्या अभंगवाणीतुन होणार संगीत भागवत कथा

अंगद सुरोशे
हिमायतनगर / प्रतिनिधी

कारला येथे दरवर्षी दक्षिण मुखी हनुमान मंदिराचा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व संगीत भागवत कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या भक्तीमय सप्ताहाचा पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.
हिमायतनगर तालुक्यातील कारला ग्रामस्थांच्या सहकार्यातून गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व संगीत भागवत कथेला आयोजन दि. 22 मार्च पासून प्रारंभ होणार असून 29 मार्च पर्यंत चालणार आहे. या सप्ताहातील कार्यक्रम संगीत भागवत कथा कथाचार्य प. पू. बालयोगी गजेंद्रजी चैतन्यजी स्वामी महाराज यांच्या सुमधुर वाणीतून होणार आहे. सकाळी काकडा,भजन, ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी 1 ते 4 संगीत भागवत कथा होणार आहे.
सायंकाळी हरिपाठ, रात्री 8 ते 10 हरिकीर्तन होणार त्यानंतर जागर भजन होईल. सप्ताहातील अनेक किर्तनकार यांचे किर्तन होणार
दि. 22 मार्च रोजी रात्री नादब्रह्म संगीत संचाचे सचिन बोंपीलवार, प्रा. ज्ञानेश्वर बोंपीलवार, कृष्णा बोंपीलवार, नामदेव बोंपीलवार यांच्या गायनाने भजन संगीत मैफिल होणार आहे. या अखंड हरिनाम सप्ताह व संगीत भागवत कथा सोहळ्याचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन कारला ग्रामस्थांनी केले आहे

Previous articleनगर प्रशासन यांनी लक्ष द्यावे ;अन्यथा आंदोलन होईल
Next articleविदर्भस्तरीय बाँडी बिल्डर. स्पर्धा संपन्न