Home Breaking News जिल्ह्यात गारासह अवकाळी पाऊस!

जिल्ह्यात गारासह अवकाळी पाऊस!

जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 16 मार्च 2023

सकाळी पासुनच आकाशात काळे ढग दिसत होते. दुपारी अचानक आलेल्या काळ्याकुट्ट ढगांनी चार वाजताच्या सुमारास जिल्ह्यात ठिकठिकाणी गारासह पाऊस पडला आहे. हदगाव तालुक्यातील निवघा बा. येथे शेतकऱ्यांच्या शेतातील केळीचे झाडे वा-यामुळे आडवी पडलेली आहेत. महामार्गवर रस्त्याच्या कडेला गाराच गारा दिसु लागल्या आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका महामार्गावरील पोलीस तपासणी केंद्रामध्ये अक्षरशः गारांचा पाऊस पडला आहे. या अवकाळी पावसामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. शेतकरी हळद काढण्याची, शिजवून सुकविणे, पाॅलीस करणे, हि कामे सध्या शेतकरी करत आहेत. हरभरा, गहु काढणी अंतिम टप्प्यात आहे. एकंदरीत या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पावसामुळे फळपिकांचे नुकसान झाले आहे.

Previous article।। पेन्शन सुरू कराना…।।
Next articleनांदेड जिल्ह्यात वरुन राजाचे थैमान गारपीट सह पावसाचे वादळी वाऱ्यासह रुद्ररुप…