Home Breaking News जननी जन्मभूमी स्वर्गाहून महान : डॉ.पंढरीनाथ शेळके

जननी जन्मभूमी स्वर्गाहून महान : डॉ.पंढरीनाथ शेळके

तोरणवाडा : समाजसेवकांच्या सेवा कार्याचा गौरव!

डॉ.शेळके हिवरा आश्रम यांचा जन्मभूमीत नागरी सत्कार

तोरणवाडा ( ५ मार्च)राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या चरण स्पर्शाने पावन झालेल्या पवित्र शिवतीर्थ तोरणवाडा येथे कर्मयोगी संत शुकदास महाराज विवेकानंद आश्रम हिवरा यांच्या विचाराने सेवा कार्य करणारे प्राचार्य डॉ.पंढरीनाथ शेळके यांना सामाजिक कार्यासाठी परदेशातून टोंगा देशाकडून मानद पीएच. डी . ने सन्मानित केले. त्याचबरोबर गेल्या 40 वर्षापासून सामाजिक, राष्ट्रीय व दिव्यांग सेवा कार्यामध्ये हे कार्यरत आहेत. त्यांना जिल्हा स्तरापासून तर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत विविध पुरस्कार, सन्मान देवून गौरविण्यात आले . त्यांना 2023 चा मनिभाई मानव सेवा ट्रस्ट.पुणे याचा भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय राष्ट्ररत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन जन्मगाव तोरणवाडा श्रीमद् भागवत कथा 2023 कथा व्यास ह. भ. प. संजय इंगळे महाराज आणि समस्त गावकरी मंडळी यांनी नागरी सत्काराचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदान तोरणवाडा येथे ह. भ. प. संजय इंगळे महाराज ग्रामस्थ किसनराव कोकणे, पंढरी पाटील, नरेश पाटील, दिलीपराव पाटील ,श्रीधर कुळसुंदर , गोपाल महाले ,विनायक महाले ,परशुराम यादव, भीमराव कुळसुंदर, राजेश कुळसुंदर ,चंद्रकांत महाले, गजानन मदगे ,श्री चक्रधर लांडे, चक्रधर महाले, भागवत महाले ,अंबादास कदम ,परसराम कदम, औदुंबर कुळसुंदर ह.भ.प. संत नामदेव कुळसुंदर प्रदीप कुळसुंदर,अरुण कुळसुंदर रामेश्वर कुळसुंदर,सागर संजय पाटील, हेमंत लांडे ,प्रशांत भारती, पोलीस पाटील बंडू महाले, हिवरा आश्रम चे प्रेमानंद नपते इत्यादी व उपस्थित ग्रामस्थ यांनी *जन्मगावी शाल,श्रीफळ,सन्मानपत्र देवून सत्कार, गौरव केला* तसेच याप्रसंगी सुरेश भैया यादव बुलढाणा, अशोक कृपाळ गुरुजी जानेफळ ,व डी. एच. जावळे गुरुजी बुलढाणा यांच्या सेवा व शिक्षण कार्याचा गौरव म्हणून सत्कार करण्यात आला.
यानिमित्ताने नरेश पाटील परिवाराने व अन्य घरी कौटुंबिक सत्कार समारंभ झाले.

डॉ.पंढरीनाथ शेळके मार्गदर्शन मनोगत व्यक्त करताना यांनी जन्मभूमीचे महत्त्व सांगताना म्हणाले जननी जन्मभूमी स्वर्गाहून महान* असे जन्म स्थळाचे वर्णन करून जन्मभूमीला वंदन केले. या पवित्र भुमिनेच मला समाज कार्य, सेवाकार्य, राष्ट् कार्य करण्याचे बळ दिले. मी हे ऋण कदापि विसरणार नाही.असे मनोगत व्यक्त केले.जन्मभूमीतील प्रत्येक बांधावासाठी सेवाकार्य करण्याचा मनोदय व्यक्त केला. ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. या गावासाठी दिवंगत ज्येष्ठ पुरशोत्तम पाटील,अर्जुनराव महाले,श्रीराम पाटील,शंकर पाटील, बाबुराव पाटील,दयाघन महाले दयासागर महाले,सुखदेव पाटील, इतराचे योगदान लाभले असे सांगितले.
ह. भ. प. संजय इंगळे महाराज यांनी डॉ. पंढरीनाथ शेळके याचा जीवन परिचय करून दिला.
श्रीमद् भागवत कथा सप्ताह निमित्त आणि सदर कार्यक्रमाला पळशी बु.,अकोला,खिरपुरी,मुंबई,बुलडाणा,पुणे ,वैरागड, खामगाव,अमरावती, पिपळगाव ठोसरे,खामखेड, मोताला,उदय नगर, देगाव,कान्हेरी,शेगाव, लाखनवाडा, डोणगाव,भालेगाव,मोहदरी तथा पंच
कोसीतील अनेक गावची मंडळी कार्यक्रमाला उपस्थित होती.
सदर श्रीमद् भागवत कथा सप्ताह साजरा करण्यासाठी संजय इंगळे महाराज यांनी उत्तम नियोजन करून शेवट पर्यंत परिश्रम घेतले.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन इंगळे महाराज यांनी तर,आभार श्री नरेश पाटील कुळसुंदर यांनी केले.
सर्वांना महाप्रसादाचे वितरण करून कार्यक्रमाचा समारोप केला.

Previous articleकृषि सहाय्यक संघटना बेमुदत संपात सहभागी!
Next articleपुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे राज्यस्तरीय महिला सन्मान सोहळा व कवी संमेलन आणि फॅशन शो