Home Breaking News कृषि सहाय्यक संघटना बेमुदत संपात सहभागी!

कृषि सहाय्यक संघटना बेमुदत संपात सहभागी!

जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – १६ मार्च २०२३

सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना यांनी 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना लागु करण्यात आलेली एनपीस योजना रद्द करून सर्वांना 1982 ची जुनी पेंशन योजना लागु करण्याच्या प्रमुख मागणीसह, राज्य शासकीय ईतर प्रलंबित मागण्यांसाठी दिनांक 14 मार्च 2023 पासुन कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे.
तेव्हा महाराष्ट्र राज्य कृषि सहाय्यक संघटना शाखा हिमायतनगर येथील कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाला आपल्या संघटनेच्या वतीने पाठिंबा दर्शविला आहे.
तालुक्यातील तहसिल, पंचायत समिती, कृषि, आरोग्य, शिक्षक, भुमी अभिलेख आदी विभागातील कर्मचारी या सपात सहभागी असल्याने कार्यालयात शुकशुकाट दिसून येत होता. या संपामुळे दैनंदिन कामकाजावर परिणाम दिसून आला आहे. सर्व कृषि कार्यालयाचे कर्मचारी यांनी प्रभारी मंडळ कृषी अधिकारी काळे साहेब यांना निवेदन देऊन बेमुदत संपाला पाठिंबा दर्शविला आहे.

Previous articleश्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर जन्मोत्सवाला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारतीताई पवार व महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री व नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे उपस्थित राहणार
Next articleजननी जन्मभूमी स्वर्गाहून महान : डॉ.पंढरीनाथ शेळके