मुख्य मागणी :- ६९ खेडी पाणीपुरवठा चालू असलेल्या योजनेला दिलेली स्थगितीच्या निर्णय उठविण्यात यावे.
बाळापूर कार्यालयीन प्रतिनिधी
कर्तव्यदक्ष आमदार नितिन बाप्पु देशमुख यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ
म्हणुन व ६९ खेडी पाणीपुरवठा योजनेला दिलेली स्थगिती उठवण्यासाठी बाळापूर येथील तहसील कार्यालयासमोर युवासेनेतर्फे आमरण उपोषणास प्रारंभ करण्यात आहे. सदर उपोषणाला
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी अकोला युवासेना जिल्हा प्रमुख भुषण गुजराती. आणी बाळापुर शहर प्रमुख नारायण मेसरे
यांच्यासह शिवसेनेचे तथा युवासेनेचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.