Home Breaking News श्रीमंत सुभेदार मल्हार राव होळकर जयंती नियोजन जोरात

श्रीमंत सुभेदार मल्हार राव होळकर जयंती नियोजन जोरात

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नंबर – 8983319070

छत्रपतींच्या संकल्पनेतील स्वराज्याचा झेंडा अटकेपार पोहचवणारे सुभेदार मल्हार राव होळकर यांची जयंती दि.18 मार्च रोजी नाशिक येथे व दि.26 मार्च रोजी चांदवड येथील रंगमहालात* साजरी होत आहे.
वरील कार्यक्रमाची तयारी,प्रचार व प्रसार संयोजक समिती कडून जोरात सुरू आहे .या निमित्ताने शहरात व ग्रामबाण भागात बैठका व निमंत्रण पोहचवण्यासाठी दौरे होत आहेत.
नुकताच संयोजन समितीने येवला ,निफाड तालुक्याचा दौरा केला व वैयक्तिक गाठीभेटी घेऊन कार्यक्रम पत्रिका वाटप केल्या.या प्रसंगी जेष्ठ समाज नेते खंडेरावजी पाटील,शिवाजी दादा ढेपले, विनायक काळदाते,समाधान बागल,श्याम भाऊ गोसावी, जाधव सर,दत्तात्रय वैद्य सर,श्री.चांगले सर,दत्तु देवरे, श्री. जाधव, पप्पू व्हलगडे ,गंगाराम काळे* व समाज बांधव उपस्थित होते.
नियोजन समितीने येवला येथे पु.अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासमोर श्रमदान करून पुष्पहार अर्पण केला.

Previous articleकारवाई च्या भितीने भर रस्त्यावरच टाकली रेती….
Next articleगुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सवना ज. येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!