Home Breaking News डॉ. मनोरमा व प्रा. हरिभाऊ शंकरराव पुंडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय...

डॉ. मनोरमा व प्रा. हरिभाऊ शंकरराव पुंडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय च्या रा. से. यो. पथकाचे विशेष शिबिराचे हिंगणा (शेळद ) येथे उदघाटन.

योगेश घायवट  बाळापुर प्रतिनिधी

बाळापूर – 9 मार्च 2023 रोजी डॉ. मनोरमा व प्रा. हरिभाऊ शंकरराव पुंडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय च्या रा. से. यो. पथकाचे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उदघाटन करण्यात आले. या शिबिराचे आयोजन दि.8 मार्च 2023 ते 15 मार्च 2023 दरम्यान मा. प्राचार्य डॉ. धैर्यवर्धन पुंडकर सर यांच्या मार्गदर्शन मध्ये करण्यात आले आहे.उदघाटन सोहळ्या करिता उदघाटक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ.धैर्यवर्धन पुंडकर सर होते तर अध्यक्ष म्हणून मा. सरपंच सौ. सुशीलाबाई सहदेव नलकांडे लाभले. प्रमुख अतिथी मा. प्रशांत कटाळकर सर, मा. अर्चना पातोंड मॅडम व ग्रा. प. सदस्य मा. करण सूर्यवंशी होते.या कार्यक्रमकरिता समस्त गावाकऱ्यांचे सहकार्य लाभले.अध्यक्षीय भाषणामध्ये मा.सरपंच सौ. सुशीलाबाई नलकांडे यांनी राष्ट्र विकासात युवकांचे योगदान व राष्ट्रीय सेवा योजना विषयी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन डॉ. जयश्री भिसे मॅडम यांनी केले तर प्रास्ताविक प्रा. पुरुषोत्तम बाठे रा से. यो. कार्यक्रम अधिकारी यांनी केले. आभारप्रदर्शन प्रा. आल्हाद भावसार यांनी केले.या कार्यक्रमा करिता महाविद्यालतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Previous articleजागतिक महिला दिनानिमित्त भव्य पुरस्कार मेळावा
Next article🔴 *महात्मा फुले शिक्षक व कर्मचारी पतसंस्था मर्यादीत हदगाव-हिमायतनगरचे सन २०२३-२८ संचालक मंडळाची बिनविरोध निवड* 🔴