अंगद सुरोशे हिमायतनगर/प्रतिनीधी
शितल भांगे व दुर्गा भारती यांच्याकडून जागतिक महिला दिनाचे आयोजन
महात्मा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांना शिक्षणाचे धडे दिले असे शिक्षण आत्मसात करून सावित्रीबाई फुले यांनी समाजातील प्रत्येक घटकातील महिलांना साक्षर केले आज प्रत्येक घटकात, प्रत्येक क्षेत्रात महिलांनी शिक्षणा वर भर देत मोठे मोठे शिखर चढत देशाचा, कुटुंबाचा, समाजाचा मान सन्मान करून दिला. डॉक्टर, पोलीस, अधिकारी ,इंजिनियर ,प्राध्यापक, अशा अनेक उच्च पदाला गवसणी घातली हे सर्व शिक्षणामुळेच घडले त्यामुळे शिक्षण हाच महिलांच्या उन्नतीचा मार्ग असल्याचे मत जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या वेळी व्यक्त करण्यात आला
जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधुन हदगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी लोकनेते बाबुरावजी कदम यांच्या हस्ते उपस्थित महिलांचा साडी चोळी, देऊन गौरव करण्यात आला जागतिक महिला दिनानिमित्त हदगाव तालुक्यातील महिलांचा सन्मान व्हावा या हेतूने शिवसेनेच्या शीतल भांगे व दुर्गा भारती यांच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकनेते बाबुरावजी कदम कोहळीकर साहेब हे होते तर महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी हदगाव येथील पोलीस उपनिरीक्षक संगीता कदम ग्रामसेविका साधना तावडे यांची उपस्थिती होती, हदगाव-हिमायतनगर मतदारसंघाचे लोकप्रिय नेते श्री. बाबुरावजी कदम साहेब युवा सेना जिल्हाप्रमुख संदेश पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच आयोजक शितल भांगे आणि दुर्गा भारती यांच्या हस्ते कमल साखरे, सुरेखा चव्हाण, वंदना पाईकराव, रुक्मिणीबाई कुंभकर्ण, बौद्धशाली पाईकराव, जयश्री पतंगे ,रेखाताई चौतमाल ,प्रतीक्षा पाईकराव ,काशीबाई बनसोडे, ज्योतीताई मुळे, सुरेखा विठ्ठल चव्हाण ,रुक्मिना येवले, संतमाला वाकोडे, प्रियंका शिंदे, लताबाई पाईकराव, पौर्णिमा हत्तीनगरे, आम्रपाली नरवाडे, रेणुका नरवाडे, यांचा गौरव करण्यात आला यावेळी पत्रकार प्रा. गजानन गिरी, ज्येष्ठ पत्रकार शाम लाहोटी ,शेख चांद पाशा, यांनी देखील आपले विचार मांडले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजक शितल भांगे ,ज्योतिबा भांगे, दुर्गा भारती, यांनी परिश्रम घेतले महिलांना सोबत घेऊन नवनवीन उपक्रम राबवले जावेत आशी प्रतिक्रिया कदम यांनी व्यक्त केली..