Home Breaking News लग्नात अनाठाई खर्च न करता मुलांच्या शिक्षणावर करा:– सहाय्यक कामगार आयुक्त डॉ.गुल्हाने

लग्नात अनाठाई खर्च न करता मुलांच्या शिक्षणावर करा:– सहाय्यक कामगार आयुक्त डॉ.गुल्हाने

@ बांधकाम कामगारांच्या ११ मुलीचा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा संपन्न

@ कल्याणकारी मजुर असोसिएशन व रोटरी क्लब (ईस्ट) चा उपक्रम

 योगेश घायवट  बाळापुर तालुका प्रतिनिधी 

कोरोना काळात कमी खर्चात विवाह सोहळे पार पडले परंतु पुन्हा लोक लग्नात अनाठाई खर्च करीत आहेत लग्नात अनाठाई खर्च न करता तो खर्च मुलाच्या शिक्षणावर करा असे आवाहन साहयक कामगार आयुक्त डॉ. राजु. दे. गुल्हाने यांनी केले. ते कल्याणकारी मजूर असोसिएशन, रोटरी क्लब ( ईस्ट) अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे आयोजित बांधकाम कामगार मजुरांच्या मुला मुलींचा सर्वधर्मीय सामुहिक विवाह सोहळयात मार्गदर्शन करतांना बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाच्या उदघाटक जिल्हाधिकारी निमा अरोरा तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.संगीताताई अढाऊ, ह्या होत्या तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये प्रमुख मार्गदर्शक साहयक कामगार आयुक्त डॉ राजु दे. गुल्हाने, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा जिल्हा परिषद सदस्या सौ.पुष्पाताई इंगळे, ओ.बी.सी. नेते. प्रा.डॉ.संतोष हुशे, जिल्हा परिषद सदस्य शंकरराव इंगळे,अत्यल्प समाज संघटना वाडेगावचे अध्यक्ष गोपाल राऊत, जसनागरा कौशल्य विकास कॉलेज सेंटर हेड अकोल्याच्या अमृता कौर नागरा, अमरावती विभागीय अध्यक्ष रा.अ.वि.(म.रा.) गजानन भिरड, सेवानिवृत्त कामगार अधिकारी डि.जी. सिरसाट, मी वडार महाराष्ट्र अकोला जिल्हाध्यक्ष तुळशीराम गुंजकर, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष संदेश गोपनारायण, कल्याणकारी मजूर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष बाबूलाल डोंगरे, रोटरी क्लब (ईस्ट)चे गांगुर्डे साहेब, सामाजिक कार्यकर्ता सुरेश मोरे, कामगार नेते अकोला शैलेश सूर्यवंशी, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनचे मधुकर गोपनारायण, प्लंब्मींग कॉन्ट्रॅक्टर रामदास शिराळे, कामगार नेते खामगाव अजय गवई, कल्याणकारी मजूर असोसिएशनच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ वंदना डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमात थोर महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्वलांने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली

त्यानंतर कार्यक्रमात बांधकाम कामगारांच्या ११ मुलींचा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा पार पडला. यावेळी होतकरु मोलकरीण मजूर, कामगार महिला मजूर, दिव्यांग महिलांचा सन्मान करण्यात आला, तसेच बँक ऑफ महाराष्ट्र व जसनागरा कौशल्य विकास कॉलेज सेंटर हेड यांच्या कडून वधुवरांना सप्रेम भेट वस्तू देण्यात आल्या.तर उज्वला खटोळ आलेगाव याच्या वतीने सर्व महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले, तसेच रमन राठी यांनी प्रिया इंगळे या मुलीला अकराशे रुपये भेट देण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतामध्ये या उपक्रमाचे कौतुक केले यावेळी कार्यक्रमांला सौ.सुनिता उपर्वट, सौ शिला सोनोने, सारिका सवंदळे. सौ वैशाली कुरई, सौ बबीता काळे, सौ.उज्वला खाटोळ, सौ दिपाली वानखडे, सौ मायावती अंभोरे, सौ.वंदना गवारगुरु, सौ अस्मिता ढोणे, कु.यमुना भांडे, रुख्मा घुगे, संगीता खंडेराव, सौ.माया इंगळे, शिलाताई तरोने, सौ सविता गवळीकर, सौ.देविका वानखडे, सौ सुनिता हिरे, निर्मला जटाळे,शोभा परकाळे, संतोष काळे, शिलवंत वानखडे, उमेश इंगळे, सुभाष इंगळे, विनोद वसु, यशवंत गारगुरू, दत्ता गावंडे, सुधिर गोपनारायन, निजार अलि निसार अली, संतोष भगत, रामदास इंगळे, सुनील चोटमल, अमित चोपडे, गजानन चोरपगार, सुभाष वाहुरवाघ, गोपाल राजकवर भुषन हिवराळे आदींनी परिश्रम घेतले. संचालन पल्लवी डोंगरे तर आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजक बाबुलालजी डोंगरे यांनी केले.

Previous articleअशोकराव शे. सिंगणवाड……. प्रगतिशील शेतकरी ते बिट जमादार
Next articleसावित्रीबाई फुले नसत्या तर महिला अशिक्षित राहिल्या आसत्या…. बाबुराव कदम कोहळीकर