दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नासिक येथे युगपुरुष सुभेदार मल्हारराव होळकर जन्मोत्सव सोहळा समिती नाशिक जिल्हा च्या वतीने नियोजन बैठक पार पडली
हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नंबर -8983319070
या बैठकीत येणाऱ्या *16 मार्च मल्हारराव होळकर जयंती जन्मोत्सव* साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले तसेच जिल्हास्तरीय जयंती साजरी करण्याचे नियोजन करण्याचे ठरले यामध्ये होळकरशाहीच्या इतिहासावर व्याख्येते, मंत्री महोदय व स्थानिक प्रतिनिधी उपस्थित असणार आहे व कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यात आली तसेच सर्व समाज बांधवांनी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी व नियोजनामध्ये सहभागी होण्यासाठी एकत्रित यावे व मल्हारराव होळकर यांच्या इतिहास समाजापुढे उभा करणे हेच ध्येय ठेवून या जयंतीची तयारी सुरू करण्यात आली. त्यासाठी अनेक तरुण मंडळी यामध्ये सहभागी झाले आणि मागील वर्षापेक्षाही भव्य दिव्य स्वरूपात जयंती साजरी होण्याचे ध्येय ठेवण्यात आले
या बैठकीमध्ये समाजातील अनेक सामाजिक व्यक्तिमत्त्व उपस्थित होते यामध्ये देविदास भडांगे, विनायक काळदाते, समाधान बागल,भाऊसाहेब राजोळे,हर्षद बुचडे,सोनाली ताई पोटे,सदाशिव वाघ, चितळकर विजय, अण्णासाहेब सापणार, हेमंत शिंदे,भूषण बच्छाव, श्याम गोसावी, वैभव रोकडे,नवनाथ शिंदे,राजाभाऊ बदाड, हिंगे पाटील, सुरेश महाराज देवकर,संदीप देवकाते,देवराम रोकडे, हे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते
यामध्ये जन्मोत्सवसोहळा समिती स्थापन करण्यात
आली यामध्ये
अध्यक्ष सोनाली ताई पोटे सर्वानुमती निवड करण्यात आली व उपाध्यक्ष म्हणून अण्णासाहेब सापनर यांची नियुक्ती करण्यात आली स्वागत अध्यक्ष म्हणून नवनाथ भाऊ शिंदे कार्याध्यक्ष म्हणून राजाभाऊ बदाड सरचिटणीस म्हणून भाऊसाहेब राजोळे यांची* सर्वानुमते निवड करण्यात आली