Home कृषीजागर ड्रॅगनफुड फळपिकांचे विक्रमी उत्पादन घेतल्यामुळे 👉 जिल्हा कृषी महोत्सवात झाला सन्मान

ड्रॅगनफुड फळपिकांचे विक्रमी उत्पादन घेतल्यामुळे 👉 जिल्हा कृषी महोत्सवात झाला सन्मान

@ कृषि विशेष @

जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 04 मार्च 2023

पारंपारिक शेती पध्दतीला फाटा देत, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत. कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शनाखाली हिमायतनगर महसूल मंडळातील हिमायतनगर शिवारात गजानन तुपतेवार आणि धनंजय तुपतेवार या युवा शेतकऱ्याने सुरुवातीला २ हेक्टर क्षेत्रावर ड्रॅगनफुड फळपिकांची ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करून लागवड केली आहे. पहिल्या वर्षी २ हेक्टर मध्ये ४,५०,००० लाख एवढे उत्पादन मिळविले आहे. दरवर्षी ड्रॅगनफुड फळपिकांची लागवड क्षेत्र वाढवत आजतागायत तब्बल २० एकरवर लागवड पुर्ण झाली आहे. पहिल्या दोन हेक्टरवरील मालाला भाव प्रतिकिलो १३० ते २०० रुपये प्रमाणे भाव लागला असुन, एकुण खर्च नऊ लाख रुपये झाला आहे. तर पहिल्याच वर्षी साडेचार लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. असेही ते म्हणाले.
कृषि विभागाकडून त्यांनी दोन सामुहिक शेततळे घेतले असून, फळबागाला पाणी कमी पडू नये. यासाठी प्लास्टिक आच्छादन करुन शेततळ्यांची निर्मीती केली आहे. यांत्रीकीकरणात ट्रॅक्टर घेतले आहे. याच त्यांच्या विशेष बाबींची दखल घेत कृषि विभागाने जिल्हा कृषि महोत्सवात त्यांचा शाल, श्रीफळ आणि मानचिन्ह देऊन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी यशोचित गौरव केला आहे.
नांदेडचे भाजपाचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगांवकर, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील सोनारीकर यांच्यासह उपविभागीय कृषी अधिकारी रणविर सर, तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव साहेब, हिमायतनगर भाजपा तालुकाध्यक्ष आशिष सकवान, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रामभाऊ सुर्यवंशी यांच्यासह आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Previous article*माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या उपोषण व धरणे आंदोलनाला यश*
Next articleलाल कांद्याचे घसरलेले दर व शेतकऱ्यांना वीज, कर्ज आदी प्रश्नांबाबत स्वराज्य संघटना